मार्चअखेर म्युरल्सद्वारे साकारणार बाबासाहेबांचा जीवनप्रवास 

मार्चअखेर म्युरल्सद्वारे साकारणार बाबासाहेबांचा जीवनप्रवास 

पिंपरी - येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या आवारात मार्चअखेर बाबासाहेबांचे जीवनप्रवास म्युरल्सद्वारे साकारण्यात येणार आहे. ब्रॉंझ धातूतील एकूण 19 म्युरल्समध्ये बाबासाहेबांचा जन्म ते महापरिनिर्वाण असे प्रसंग चितारले आहेत. त्यामुळे स्मारक नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. 

म्युरल्सची वैशिष्ट्ये 
- मूळ छायाचित्रांवरून प्रसंग चित्रण 
- ब्रॉंझ धातूचे शहरात पहिलेच म्युरल्स 
- मार्बलवर सुवर्ण अक्षरात प्रसंगांची माहिती 
- ब्रॉंझ धातूंमुळे म्युरल्स अनेक वर्षे टिकणार 
- मध्यवर्ती ठिकाणामुळे पर्यटन स्थळ होणार 

असे असतील म्युरल्स 
बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ (प्रत्येकी लांबी 16.5 फूट, रुंदी 11.5 फूट) 
- बाबासाहेबांकडून राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे राज्यघटना सुपूर्त 
- नागपूर येथे दीक्षा समारंभात भाषण करताना जमलेला जनसमुदाय 
- महाडमधील चवदार तळ्याचा सत्याग्रह 
- नाशिकमधील काळामंदिर सत्याग्रह 

सीमाभिंतीवर (प्रत्येकी लांबी 12 फूट, रुंदी 7 फूट) 
- डॉ. आंबेडकर बालपणी शाळेबाहेर बसून शिक्षण घेताना 
- प्रतिकूल परिस्थितीत सरकारी दिव्याखाली अभ्यास करताना 
- अस्पृश्‍य असल्याने बैलगाडीतून खाली उतरवितानाचा प्रसंग 
- मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर बुद्धचरित्र देताना केळुसकर गुरुजी 

- कुटुंबीयांसोबत बाबासाहेब 
- खुर्चीत बसून लेखन करताना 
- माणगाव परिषदेत बाबासाहेबांना दलितांचा नेता घोषित करताना शाहू महाराज 
- लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स येथे मिळवलेली पदव्युत्तर पदवीचा प्रसंग 
- औरंगाबादेत महाविद्यालय स्थापना 
- पहिल्या गोलमेज परिषदेत दलितांबाबत आवाज उठविताना 

- पुणे करार 
- वेरूळची लेणी पाहताना 
- संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासमवेत 
- केंद्रीय कायदेमंत्री पदाची शपथ घेताना 
- देहूरोडला बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करताना 

कोलाज 
- पदवी मिळाल्याचा प्रसंग 
- मजूरमंत्री पदाची शपथ घेताना 
- फोटोग्राफी शिकताना 
- बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर 

- महापरिनिर्वाण 
- बाबासाहेबांना 1990 मध्ये मरणोत्तर दिलेला भारतरत्न किताब स्वीकारताना माईसाहेब आंबेडकर. 

महापालिकेची तरतूद, नियोजन 
म्युरल्ससाठी : दोन कोटी 98 लाख 
बांधकाम, नक्षीकाम, लॅंडस्केपिंग : एक कोटी 39 लाख 
एकूण अपेक्षित खर्च : चार कोटी 37 लाख रुपये 
रमाबाई आंबेडकरांचा ब्रॉंझ धातूतील पुतळा : साडेनऊ फूट उंच 

ब्रॉंझ धातूतील म्युरल्सचा राज्यातील एकमेव प्रकल्प असेल. अधिकाधिक म्यूरल्स प्रत्यक्ष छायाचित्रांवरून केल्याने प्रसंगांमध्ये वास्तवता निर्माण झाली आहे. म्यूरल्स बसविण्याचे काम मार्चअखेर सुरू होईल. 
- महेंद्र थोपटे, शिल्पकार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com