पिंपळे गुरव: महिला मेळाव्यात महिलांचा सन्मान

juni-sangvi-women-day
juni-sangvi-women-day

जुनी सांगवी-  परिसरातील महिलांसाठी महिलादिनाचे औचित्य साधुन विविध क्षेत्राय योगदान करणा-या महिलांचा प्रतिभा महिला प्रतिष्ठाण यांच्या वतीने येथील महापालिकेच्या रंगकर्मी नटसम्राट निळु फुले नाट्यमंदीरात आयोजित महिला मेळाव्यात सत्कार करण्यात आला. प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी येथे महिला मेळाव्याचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. आश्विनी जगताप होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्री. श्रावण हर्डीकर हे उपस्थित होते. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे विधी समितीच्या शारदा सोनवणे, बाल कल्याण समिती अध्यक्षा सुनिता तापकीर, नगरसेविका सीमा चौगुले, माई ढोरे, माधवी राजापुर, चंदा लोखंडे, आरती चौधे, निर्मला कुटे, तहसीलदार रोहिणी विरुळे शुभांगी जगताप, अनुश्री ढोरे, सुजाता कांबळे, सुषमा कदम, नगरसेवक अंबरनाथ कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.  

कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका उषाताई मुंढे यांनी केले. माऊली जगताप यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित असलेले आयुक्त श्री श्रावण हर्डीकर यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी सौ.अश्विनी जगताप यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, मी आमदार पत्नी असले तरी, मी एक गृहिणी देखील आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवावा''. 

यावेळी रोहिणी विरुळे (तहसीलदार), प्रियंका मानकर (स्पर्धा परीक्षा तयारि), संगिता पाचंगे (पत्रकार) सीमा ननवरे, अलका सरद, सुनंदा गायकवाड, अपुर्वा शेलगावकर सिनेअभिनेत्री मंदा सातव, मालती डांगरे. जोत्सना वानखेडे, संगिता बामगुडे, उज्ज्वला जाधव,माधुरी लवटे यांना सन्मानित करण्यात आले.  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नामदेव तळपे यांनी केले. कार्यक्रमादरम्यान महिलांनासाठी पिंपळे गुरव परिसरातुन तेजस्वी या बसचे उद्घाटन करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com