सेंद्रिय राख्यांचा 'विदर्भ ब्रँड'

प्राजक्ता ढेकळे
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

देशी कापसापासूना तयार झालेल्या धाग्यापासून, नैसर्गिक रंगाचा वापर करून राख्या तयार केल्या आहेत. या राख्या तयार करत असताना कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर केलेला नाही. केवळ देशी आणि सेंद्रिय वस्तूंचा वापर यामध्ये केला आहे. विविध प्रकारचे नक्षीकाम असलेल्या एकूण 18 प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत.

विदर्भ म्हटले की डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते सततचा दुष्काळ आणि आत्महत्या केलेले शेतकरी, पाणी टंचाईचे...मात्र माथ्यावरचा हा कलंक कायमस्वरूपी पुसून टाकण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम नेहमीच विदर्भातील महिला शेतकाऱयांकडून राबवले जातात. या विविध उपक्रमांपैकी एक असणाऱ्या राख्यांच्या उपक्रमाविषयी ...

हा नावीन्यपूर्ण देशी राख्यांचा उपक्रम विदर्भातील वेगवेगळ्या खेड्यातील 50 महिला शेतकरी आणि मध्यप्रदेशातील चिंदवाडमधील महिला शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नागपूर बीजोत्सव ग्रुप आणि ग्राम आर्ट प्रॉजेक्ट यांच्या सहकार्याने यावर्षीच्या रक्षाबंधन साठी खास राबविला आहे.

देशी कापसापासूना तयार झालेल्या धाग्यापासून, नैसर्गिक रंगाचा वापर करून राख्या तयार केल्या आहेत. या राख्या तयार करत असताना कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर केलेला नाही. केवळ देशी आणि सेंद्रिय वस्तूंचा वापर यामध्ये केला आहे. विविध प्रकारचे नक्षीकाम असलेल्या एकूण 18 प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. या राख्या कापसापासून तयार झालेल्या धागा, नैसर्गिक रंगाचा वापर, सेंद्रिय बियाण्यांचा वापर करून बनविल्या आहेत. शिवाय राख्यांमध्ये केलेला बियाण्याचा वापर मूळ जमिनीकडे घेऊन जाणारा आहे.

या राख्यांमध्ये बियाण्यांचा वापर करण्यामागचा मुख्य उद्देश हा सेंद्रिय पद्धतीच्या शेतीचा प्रचार व प्रसार व्हावा हा आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहीण-भावामधील अतूट नाते या राखीवरील बियापासून तयार होणाऱ्या रोपट्याप्रमाणे वाढीस लागावे, असा हेतू आहे.

या उपक्रमाच्या निमित्ताने या शेतकरी महिलांच्या कष्टाला हातभार लावण्यास व शेतकरी महिलांमधील सक्रियता वाढण्यास मदत कारण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून शेती प्रश्नाची जाण असलेली अनेक शेतीप्रेमी लोक स्वयंसेवक म्हणून या राख्यांच्या विक्रीचे काम करत आहेत. या स्वयं सेवकामध्ये तरूणांचा सहभाग मोठा आहे. पुण्यातील एस.एम. जोशी सभागृहात या राख्यांच्या विक्रीचा स्टॉल लावण्यात आला आहे. अत्यंत स्वस्त दरात या राख्या या ठिकाणी विक्रीस उपलब्ध आहेत. या उपक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा देशी बियाण्याचा वापर आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. आता वेळ आहे ती लोकांच्या सहभाग आणि प्रतिसादाची.