सांगवीत स्वच्छता मोहिमेत आरोग्य विभागासह स्थानिक मंडळांचे श्रमदान

swachta-mohim
swachta-mohim

जुनी सांगवी : जुनी सांगवी प्रभाग क्र. ३२ सांगवी परिसरांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभाग व स्थानिक मंडळांच्या सहभागातून येथील शिवाजी पार्क, ममतानगर, संगमनगर भागात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत परिसरातील मोकळ्या जागेमधील कचरा, प्लास्टिक उचलण्यात आले. 

या विशेष मोहिमेत प्रभागातील नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे आणि नगरसेविका उषा उर्फ माई ढोरे, शारदा सोनवणे तसेच शिवराया मित्र मंडळ संयुक्त साह्यकरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष साई कोंढरे, ऋषिकेश कदम, प्रतिक किरदत्त, शुभम चाँद, अजिंक्य बोर्डे व इतर कार्यकर्ते या सर्वांनी स्वच्छता मोहीम राबविली. यामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे एकूण ६० कर्मचारी व आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, आरोग्य मुकादम अंकुश गवारे, नारायण शितोळे आणि कर्मचारी प्रविण गायकवाड, प्रकाश कांबळे, वरूण कांबळे आदींनी श्रमदान केले.

श्रमदानातून अडीच टन कचरा गोळा करून उचलण्यात आला. 'स्वच्छ सर्वेक्षण २०१८' मध्ये शहराला सर्वोच्च मानांकन मिळण्यासाठी व सामाजिक स्वच्छतेची जबाबदारी म्हणून  नागरिक, लोकप्रतिनिधी व प्रशासन या सर्वांनी एकत्र येऊन काम केले. अशाप्रकारे जनचळवळीचे स्वरूप निर्माण झाल्यास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दूरदृष्टीने पाहिलेले स्वच्छ अभियान मिशन २०१९ या कालबद्ध कार्यक्रमाचे स्वप्नांअंतर्गत भारत स्वच्छ समृद्ध निश्तितच होईल. असे मत नगरसेवकांनी व्यक्त केले.  

याबाबत आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी म्हणाले, की स्मार्ट सिटी प्रमाणे स्मार्ट सिटिजन्स होणेदेखील महत्वाचे आहे. नागरिकांनी कचरा उघड्यावर टाकू नये. त्यासाठी कचरा कुंडीचा वापर करावा. कचरा समस्येवर त्रागा करण्यापेक्षा घराघरांतून ओला व सुका कचरा वेगळा करणे अपरिहार्य आहे. त्यासाठी सर्वांनी योगदान दिले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com