एमआयडीसी करणार 16 झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

पिंपरी - एमआयडीसी आणि एमआयडीसीने महापालिकेकडे हस्तांतरित केलेल्या शहरातील 35 हेक्‍टर जागेवर उभ्या असणाऱ्या 16 झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. एमआयडीसी आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनेनुसार त्यासंदर्भातील धोरण तयार केले जात असून, येत्या काही दिवसांत हा प्रश्‍न मार्गी लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पक्‍की घरे मिळणार आहेत. 

पिंपरी - एमआयडीसी आणि एमआयडीसीने महापालिकेकडे हस्तांतरित केलेल्या शहरातील 35 हेक्‍टर जागेवर उभ्या असणाऱ्या 16 झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. एमआयडीसी आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनेनुसार त्यासंदर्भातील धोरण तयार केले जात असून, येत्या काही दिवसांत हा प्रश्‍न मार्गी लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पक्‍की घरे मिळणार आहेत. 

पिंपरी-चिंचवड बरोबरच ठाणे आणि म्हापेमध्ये एमआयडीसीच्या जागांवर झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या आहेत. या तिन्ही ठिकाणी ही योजना राबविण्याची सरकारची योजना आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आकुर्डीतील अजंठानगर, काळभोरनगर, मोहननगर, भोसरीमधील महात्मा फुलेनगर, गवळीनगर वसाहत, बालाजीनगर, गणेशनगर, लांडेवाडी, मोरवाडी, इंदिरानगर, दत्तनगर, आंबेडकरनगर, शांतिनगर या भागात झोपडपट्ट्या असून, त्यातील काही एमआयडीसीच्या जागेवर तर काही एमआयडीसीने महापालिकेकडे हस्तांतरित केलेल्या जागेवर उभ्या आहेत. 

एमआयडीसीच्या जागेवरील झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी झोपडपट्‌टी पुनर्वसन प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 22 जानेवारी 2016 रोजी त्यासंदर्भातील प्रस्ताव प्रधान सचिवांकडे, तर 19 मार्च 2016 रोजी एमआयडीसीने सरकारला पाठवला आहे. एमआयडीसीने महापालिकेला 1982 ते 1986 या कालावधीत 41 खुल्या जागांचे भूखंड हस्तांतरित केले होते. हे भूखंड उद्यानांसाठी दिले होते. त्यापैकी ओएस-11 मध्ये विद्यानगर आहे. ओएस-44 व ओएस 132 मध्येही झोपडपट्टी आहे. तिथेही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्याचे नियोजन सुरू आहे. 

एमआयडीसीच्या जागांवर असणाऱ्या झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी झोपडपट्‌टी पुनर्वसन प्रकल्प राबवण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. यासंदर्भात संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू आहे. 
- अजित देशमुख, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी. 

पुणे

तळेगाव स्टेशन : तळेगाव-चाकण रस्त्यावरील ऐश्वर्या हॉटेलमागील गोडाऊन परिसरात सोमवारी (दि. १८) रात्री भक्ष्य खाताना बिबट्या सदृश्य...

05.12 PM

खडकवासला : नांदेड फाटा येथील सिंहगड स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉ. संतोष आवारी यांच्यावर ७५ वर्षीय रुग्णाकडून चाकूने हल्ला...

02.00 PM

पुणे - दसरा आणि दिवाळीचा मुहूर्त साधून केंद्र, राज्य सरकार सामान्य नागरिकांना महागाईच्या खाईत लोटत असल्याचे सांगत, महागाईचा निषेध...

04.27 AM