मुळा नदीने घेतला मोकळा श्वास, डासांचा उपद्रव झाला कमी

रमेश मोरे
शनिवार, 26 मे 2018

जुनी सांगवी - मुळा, पवना नद्यांच्या संगमावर वसलेल्या सांगवीकरांना जलपर्णी व डासांच्या त्रासाचा सामना दरवर्षी करावा लागतो. गेली अनेक वर्षापासुन जलपर्णी हे सांगवीकरांच कायमचं दुखणं झालं आहे. या हंगामात तर साचलेली जलपर्णी व त्यामुळे वाढलेल्या डासांचा उपद्रव सांगवीकरांना नको नकोसा झाला होता. महापालिकेकडुन या विषयांकडे झालेले दुर्लक्ष तोकडी यंत्रणा, ठेकेदाराने कामास लावलेली दिरंगाई, बोपोडी पुलाच्या कामासाठी टाकलेला भराव व त्यामुळे प्रवाह थांबलेले पाणी आणी त्यावर जोमाने फोफावलेली जलपर्णी यामुळे उकाड्याबरोबरच सांगवीकरांना डासांमुळे घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते.

जुनी सांगवी - मुळा, पवना नद्यांच्या संगमावर वसलेल्या सांगवीकरांना जलपर्णी व डासांच्या त्रासाचा सामना दरवर्षी करावा लागतो. गेली अनेक वर्षापासुन जलपर्णी हे सांगवीकरांच कायमचं दुखणं झालं आहे. या हंगामात तर साचलेली जलपर्णी व त्यामुळे वाढलेल्या डासांचा उपद्रव सांगवीकरांना नको नकोसा झाला होता. महापालिकेकडुन या विषयांकडे झालेले दुर्लक्ष तोकडी यंत्रणा, ठेकेदाराने कामास लावलेली दिरंगाई, बोपोडी पुलाच्या कामासाठी टाकलेला भराव व त्यामुळे प्रवाह थांबलेले पाणी आणी त्यावर जोमाने फोफावलेली जलपर्णी यामुळे उकाड्याबरोबरच सांगवीकरांना डासांमुळे घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. नदी किनारा भागातील रहिवाशांना डासांच्या उपद्रवाबरोबरच जलपर्णीमुळे दुर्गंधीयुक्त वासाचा सामना करावा लागत होता. पिंपरी चिंचवड शहरातील काही स्वयंसेवी सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने पवना नदीतील दशक्रिया विधी घाट ते सांगवी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुलापर्यंतची जलपर्णी दोनदा काढण्यात आली.

नागरीकांच्या वाढत्या तक्रारींमुळे अखेर विद्यमान सत्ताधारी मंडळींनी पालिका आयुक्तांना या परिसराची पाहणी करण्यासाठी पाचारण केले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडुन पालिका आयुक्तांनी डासांचा त्रास पहाण्यासाठी रात्रीच्या वेळेला भाजी खरेदीसाठी सांगवीत यावे या आशयाचे निवेदन दिले होते. उन्हाळा संपता संपता अखेर जलपर्णी काढल्याने चार पाच महिन्यांपासुन जलपर्णीत गुदमरलेल्या नदीने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. 

जलपर्णी काढल्याने सांगवी परिसरात डासांचा उपद्रवही कमी झाल्याने नागरीकांमधुन शांत झोपेचे समाधान व्यक्त होताना दिसत आहे. सांगवीकरांना जलपर्णी व डासांनी जगणे असह्य केले होते. तर पालिका प्रशासनाच्या तोकड्या यंत्रणेचा मनस्ताप सहन करावा लागला होता. अनियमित धुरीकरण, जलपर्णी काढण्याबाबतचा वेळकाढुपणा यामुळे सत्ताधारी मंडळीही प्रशासनावर हताश झाली होती. जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या काळात नागरीकांना जलपर्णी बाबत उत्तरे देतादेता याकाळात सत्ताधारी मंडळीच्या नाकी नऊ आल्याचे पहावयास मिळाले. काही सामाजिक संस्था, व राहिमाई महिला प्रतिष्ठानच्या वतीने या काळात डासमुक्तीसाठी धुरीकरण करण्यात आले. 

मुळा पवना नदीपात्र मोकळे झाले असले तरी वरच्या भागातील जलपर्णीचे तुरळक पुंजके प्रवाहासोबत वहात येत असल्याचे दिसते. काही दिवसांवर येवुन ठेपलेल्या पावसाने शिल्लक पुंजकेही वाहुन जातील परंतु, पुढच्या वर्षीचे काय? 'जैसे थे'च का ? असा प्रश्न ही नागरीकांना पडला आहे. 

Web Title: Mula river is now free from jalaparni plant and mosquitoes reduced