भाजपचे नगरसेवक आता पक्षविस्तारक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

पिंपरी - भाजपचे 77 नगरसेवक आणि पदाधिकारी आता पक्षविस्तारक म्हणून काम करणार आहेत. पक्षाचे काम आणि सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यकर्त्याच्या भूमिकेतून त्यांना हे काम करावे लागणार आहे. बूथनिहाय पक्षबांधणीसाठी शहर भाजपतर्फे आठवडाभरात ही मोहीम हाती घेण्याचे नियोजन आहे, अशी माहिती सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी मंगळवारी दिली. 

पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्ष समारोपाच्या निमित्ताने भाजपने पक्षविस्तारक योजना हाती घेतली आहे. पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीने दिलेल्या निर्णयानुसार ही योजना कार्यान्वित होणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांच्यावर सोपविली आहे. या योजनेत निवडलेल्या विस्तारकांना किमान पंधरा दिवसांसाठी सक्तीने वेगवेगळ्या गावांत जाऊन पक्षसंघटना वाढीसाठी काम करावे लागणार आहे. त्यापूर्वी, पक्षविस्तारकांचा अभ्यास वर्ग घेतला जाणार आहे. शहराच्या विविध भागांतील कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडून घेणे, पक्षाचे आणि सरकारचे काम लोकांपर्यंत पोचविणे यासाठी संबंधित पक्षविस्तारकांना त्यांना नेमून दिलेल्या भागामध्ये काम करावे लागेल.

Web Title: PCMC corporators of the BJP