मोदींच्या 'प्रचारक ते पंतप्रधान' प्रवासाच्या छायाचित्र व बातम्यांचे प्रदर्शन

ज्ञानेश्वर भंडारे
रविवार, 27 मे 2018

वाल्हेकरवाडी  : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “प्रचारक ते पंतप्रधान” सर्व या प्रवासाविषयी महाराष्ट्रातील नामांकित मराठी माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या छायाचित्र व बातम्याचे प्रदर्शन पिंपरी-चिंचवड येथील नितीन चिलवंत यांनी बालगंधर्व कलादालन  पुणे येथे दि. २७, २८, २९ रोजी भरविले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे व पिंपरी- चिंचवड परिसरातील महानगरपालिकेचे स्वच्छता कामगार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

वाल्हेकरवाडी  : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “प्रचारक ते पंतप्रधान” सर्व या प्रवासाविषयी महाराष्ट्रातील नामांकित मराठी माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या छायाचित्र व बातम्याचे प्रदर्शन पिंपरी-चिंचवड येथील नितीन चिलवंत यांनी बालगंधर्व कलादालन  पुणे येथे दि. २७, २८, २९ रोजी भरविले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे व पिंपरी- चिंचवड परिसरातील महानगरपालिकेचे स्वच्छता कामगार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी या प्रदर्शनात भारत सरकारच्या नवीन योजनांचा शुभारंभ करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मन कि बात मध्ये साधलेला संवादाची कात्रणे, मोदी यांचे भारतातील विविध राज्यातील विधानसभा रण संग्रामातील प्रचारक, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध देशातील पंतप्रधान राष्ट्रप्रमुख यांच्या पंतप्रधान मोदी यांच्याशी भेट-गाठी व देशांतर्गत विविध करार, विविध कार्यक्रमाचे केलेले उद्घाटन, पंतप्रधान पदाचे उमेदवार लोकसभा निवडणूक २०१४, नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय नेतृत्त्व, पंतप्रधान यांचे विदेशातील दौरे इ. छायाचित्र व वृत्तपत्रातील बातम्याच्या कात्रणाचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी २ ऑक्टोबर २०१४ रोजी नवी दिल्ली येथून स्वच्छ भारत अभियानाचा शुभारंभ केला. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीपर्यंत आपला संपूर्ण भारत देश स्वच्छ भारत करण्याचे स्वप्न पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदींनी पाहिले आहे आणि ते साकारण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वच्छ भारत अभियानातून प्रेरणा घेऊन सामाजिक बांधिलकीतून स्वच्छ भारत समृध्द भारत चित्रप्रदर्शन भरविणार आले आहे. त्यांना 
सहकार्य शिवकुमार बायस यांनी केले आहे. 

"मी महाराष्ट्रातील नामांकित मराठी वृत्तपत्रांचा वाचक आहे. मराठी वृत्तपत्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयीच्या बातम्या व छायाचित्रांचे कात्रणे संकलित करून त्यांचे सुंदर केसरी रंगाच्या वेलवेट पेपरचे भितीपत्रक तयार केले आहेत. तसेच प्रदर्शनामध्ये मराठी वृत्तपत्रात पंतप्रधान मोदी यांच्या बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांचे विषयानुसार कात्रणाची पुस्तक तयार केली आहेत, ती प्रदर्शनात ठेवण्यात आलेली आहेतव पुढील प्रदर्शन हे संसद भवनात ठेवण्याचा मानस आहे."  - नितीन चिलवंत

 

Web Title: photographs and news show on modi's journey to 'prime minister of India'