चिंचवड तोडफोड प्रकरणातील 18 जण पोलिसांच्या ताब्यात 

रविंद्र जगधने
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

पिंपरी - चिंचवडगाव परिसरात दहशत पसरविण्यासाठी तलवारी, हॉकीस्टिक, पेव्हींग ब्लॉक साहाय्याने मारहाण करत परिसरातील सुमारे 10 चारचाकी व दुचाकींची तोडफोड करण्यात आली. ही घटना गुरुवारी (ता. 7) रात्री सव्वा दहाच्या सुमारास मंडलमुर्तीवाडा ते हनुमान मंदिर व पागेची तालीम परिसरात घडली. या दोन्ही टोळ्यांतील एकूण 18 जणांना चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यामध्ये चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. 

प्रशांत दिलीप यादव (वय 30, रा. भास्कर केशव अपार्टमेंट, चिंचवडगाव), अक्षय अरुण काशीद (वय 24, रा. प्रीतम अपार्टमेंट, चिंचवड), प्रवीण दिलीप यादव (वय 32, रा. भास्कर केशव अपार्टमेंट), सचिन अनिल खोल्लम (वय 20, रा. कवटेची तालीम, चिंचवडे चाळ, चिंचवड), गोपाळ संजय यादव (वय 18, रा. भीमपुरा गल्ली2, भोपळे चौक, कॅम्प, पुणे), निरंजन आनंद जगताप (वय 18, रा. ए- काकडे पार्क, चिंचवड), शुभम विनायक चौधरी (वय 20, रा. केशवनगर, पागेची तालीम, चिंचवड), दीपक कोंडिबा भिसे (वय 19, रा. पावर हाउस चौक, चिंचवड), अंबड संदेश तलाठी (वय 21, रा. दर्शन हॉलच्या मागे, चिंचवड) मंगेश नंदकुमार सांगळे (वय 20, रा. केशवनगर, चिंचवड), आकाश तानाजी लांडगे (वय 22, तलाठी ऑफिसजवळ, चिंचवडगाव), ओंमकार बाबू नेहरे (वय 18, रा. पौर्णिमा स्विटशेजारी, बनसोडे चाळ, चिंचवड), साहिल सुधीर कांकरिया (वय 18, रा. गांधीपेठ, चिंचवड), ललित सुनील सुतार (वय 22, रा. केशवनगर, गुलमोहर कॉलनी, चिंचवड) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे असून यातील चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून यादव गटाने रात्री साडेनऊच्या सुमारास विक्की अनिल घोलप (वय 20, लक्ष्मीगंगा अपार्टमेंट, चिंचवड) याला कोयता व हॉकीस्टीकने मारहाण केली. त्यानंतर सव्वा दहाच्या सुमारास यादव व घोलप गटात पुन्हा भांडणे झाली. त्यावेळी त्यांनी परिसरात दहशत पसरविण्यासाठी घराबाहेर लावलेल्या गाड्यांची तोडफोड केली. नागरिकांनी याबाबत पोलिसांनी कळवताच हल्लेखोर पसार झाले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी पहाटेपर्यंत संशयितांना शोधून त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान परिसरात भीतीचे वातावरण कायम असून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.