तुम्ही पिंपरी चिंचवडमधील PMP बससेवेबद्दल समाधानी आहात?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

तुमच्या समस्या, म्हणणं खाली प्रतिक्रियांमध्ये थोडक्यात मांडा. 

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत अंतर्गत भागात पीएमपी बससेवा पुरेशा प्रमाणात नाही, असे आहे लोकप्रतिनिधींचे म्हणणे. त्यासाठी त्यांनी पीएमपी प्रशासनाला द्यावयाचे सहा कोटी रुपये अडवून धरले आहेत. आतापर्यत महापालिकेने पाचशे कोटी रुपये दिले आहेत. पुरेशा गाड्या आहेत, असा पीएमपी प्रशासनाचा दावा आहे..

या वादामुळे काही नवे बसमार्ग सुरू होतीलही. जादा गाड्याही मिळतील. पण मार्ग तोट्यात सुरू राहिल्यास त्या बंदही होतील. त्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन त्यांना कोणते नवे मार्ग हवे आहेत. त्याच्या वेळा काय असाव्यात. यावर आपले म्हणणे थोडक्यात कळवावे. त्यांचे एकत्रित मुद्दे पीएमपी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींपर्यंत पोचविता येतील. 
प्रतीक्षा आहे तुमच्या प्रतिक्रियेची...