योगप्रेमींचा भरभरून प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

पिंपरी - पिंपरी चिंचवडमध्ये व्याख्याने, शिबिरे, प्रात्यक्षिके, अभ्यासवर्गातून ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ बुधवारी (ता. २१) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी अशा सर्वच स्तरांतील योगप्रेमींनी त्यात भाग घेतला. 

पिंपरी - पिंपरी चिंचवडमध्ये व्याख्याने, शिबिरे, प्रात्यक्षिके, अभ्यासवर्गातून ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ बुधवारी (ता. २१) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी अशा सर्वच स्तरांतील योगप्रेमींनी त्यात भाग घेतला. 

संस्था, संघटनाचा सहभाग
चिंचवड येथील चापेकर स्मारक समिती, सोहम योग साधना, आपले चिंचवड व्यासपीठ यांच्यातर्फे आयोजित योग प्रशिक्षण कार्यक्रमाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. चापेकर वाडा येथे सकाळी हा कार्यक्रम झाला. योगशिक्षक दिगंबर उचगावकर, अनुजा उचगावकर यांनी योगाचे धडे दिले. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संदीप जाधव, महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आपले चिंचवड व्यासपीठचे अध्यक्ष गजानन चिंचवडे, क्रांतिवीर चापेकर समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, सहकार्यवाह रवी नामदे, सदस्य नितीन बारणे उपस्थित होते. चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सच्या सभागृहात ‘यशस्वी ॲकॅडमी फॉर स्किल्स संस्थेच्या’वतीने सामूहिक योगाभ्यास वर्ग आयोजित केला. योग प्रशिक्षिका रवींद्र परांजपे, सुनीता पाटील, नागेश नाले व प्रिया कावरे यांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. संस्थेच्या प्रा. बी. एस. कुंटे, संचालक संजय छत्रे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले. संभाजीनगरमध्ये योगाभ्यास करण्यात आला. नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेवक तुषार हिंगे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गिरीश वैद्य, उत्तम कुटे, श्रीराम कुलकर्णी, ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावाटे, संजय ढमढेरे उपस्थित होते. शीला झामरे यांनी योगाचे प्रात्यक्षिके दाखविले.

शाळा, महाविद्यालयांत योग
रुपीनगर येथील नवमहाराष्ट्र प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विविध आसन प्रकार घेण्यात आले. मुख्याध्यापिका एच. वाघ यांनी मार्गदर्शन केले. भोसरीतील श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पाच हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा झाला. योगतज्ज्ञ डॉ. नारायण वाघोले यांनी योगासनांचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिके करून घेतली. मानसिक व शारीरिक ताणतणावावर मात करण्यासाठी योगासने उपयुक्‍त असल्याचे त्यांनी सांगितले. भोसरीतील शेठ रामधारी रामचंद्र आगरवाल विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष अमृत पऱ्हाड यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. शैलेश म्हस्के यांनी योगशास्त्राचा परिचय करून दिला. योग अभ्यासक योजना पावसेकर, सोनाली फाये यांनी योगाचे महत्त्व सांगितले. संचालक रमेश कुलकर्णी, रमेश सराफ, जनार्दन देशपांडे, नलिनी कुलकर्णी उपस्थित होते. यमुनानगर येथील प्रो. ए. सोसायटी प्राथमिक विद्यामंदिरातील कार्यक्रमात ७६७ विद्यार्थ्यांना भाग घेतला. कैलास माळी यांनी मार्गदर्शन केले. शरद इनामदार, दिलीप परब, राजीव कुटे, किरण वारके उपस्थित होते. आकुर्डीतील श्री सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात योगसंदेश देण्यात आला. निगडीतील श्री गुरू गणेश विद्यामंदिर, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजमध्ये संस्थेचे मानद सचिव राजेंद्र मुथा, सहा. सचिव अनिल कांकरिया, मुख्याध्यापिका योगिता भेगडे कार्यक्रमाला उपस्थित होत्या. चापेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य डॉ. सूर्यकांत आरेकर यांनी योगाचे महत्त्व विशद केले. योग विद्याधाम सोहम योग साधनेचे दिगंबर उचगावकर, अनुजा उचगावकर, रश्‍मी उचगावकर उपस्थित होते. अंगद गरड यांनी योगाचे फायदे सांगितले. एसएनबीपी स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये योगतज्ज्ञ एस. पी. साकेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व शिक्षकांनी योगासने केली. योगावर आधारित घोषणा देण्यात आल्या. संस्थेच्या संचालिका ऋतुजा भोसले, प्राचार्य सुनील शेवाळे, पर्यवेक्षिका विनिता कुलकर्णी उपस्थित होत्या. मोशीतील यशस्वी प्राथमिक विद्यालयाचे संस्थापक, अध्यक्ष सुभाष देवकाते, मुख्याध्यापिका शोभा देवकाते यांनी विद्यार्थ्यांना योगासाठी प्रेरित केले. आकुर्डीतील प्रा. रामकृष्ण मोरे आर्टस, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयात आयोजित योग शिबिराला प्राचार्य डॉ. एम. जी. चासकर, उपप्राचार्य डॉ. नीलेश दांगट, डॉ. तुषार शितोळे, डॉ. अभय खंडागळे उपस्थित होते. विद्यार्थिनी संचिता भोईर, श्रेया कंधारे यांनी सूर्यनमस्कार व आसनांचे प्रशिक्षण दिले. डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. सुधीर बोराटे, प्रा. ज्ञानेश्‍वर चिमटे, डॉ. बी. एल. राठोड यांनी संयोजन केले. वाकड येथील शिष्य स्कूलमधील कार्यक्रमाला डॉ. सुनंदा राठी उपस्थित होत्या.

नेहरू युवा केंद्र आणि रोशनी फाउंडेशनच्या वतीने निगडीतील आयआयसीएमआर कॉलेजमध्ये खासदार अमर साबळे यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा झाला. प्राचार्या डॉ. अरुणा देऊसरकर, समन्वयक अरविंद वागसकर, संचालक डॉ. अभय कुलकर्णी उपस्थित होते. चेतन परदेशी, अंकिता नगरकर यांनी संयोजन केले. विद्यादीप प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी योगासने केली. चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांकरिया, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. पांडुरंग इंगळे, डॉ. आनंद लुंकड, प्रा. डॉ. रुपा शहा, शबाना शेख यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा झाला. नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक व मुलांनी योगासने केली. क्रीडा शिक्षक महेश नलावडे, पवित्रा पवार यांनी योगाचे महत्त्व सांगितले. इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे, विलास जेऊरकर, विश्‍वस्त डॉ. प्रिया गोरखे, प्राचार्या डॉ. कांचन देशपांडे उपस्थित होत्या.