पालिकेच्या 39 प्राथमिक शाळा बंद 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणावर घटल्याने तब्बल 39 शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने शुक्रवारी घेतला. या विद्यार्थ्यांना नजीकच्या महापालिका शाळेत जाण्यास सांगितले आहे. 

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणावर घटल्याने तब्बल 39 शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने शुक्रवारी घेतला. या विद्यार्थ्यांना नजीकच्या महापालिका शाळेत जाण्यास सांगितले आहे. 

दहा-वीसपेक्षा कमी पट असलेल्या या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या 128 प्राथमिक शाळा असून, सुमारे 35 हजार पटसंख्या आहे. यावर्षी बऱ्याच शाळांमध्ये शिक्षक व विद्यार्थी यांचे प्रमाण व्यस्त असल्याचे दिसून आले. त्यामुळे 20 पेक्षा कमी पट असलेल्या किंवा काठावर पट असलेल्या प्राथमिक शाळांतील शिक्षक कमी करून गरजेनुसार त्यांना अन्य शाळांत नियुक्त केले जाईल. मात्र, या निर्णयाला शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला आहे. 

दरम्यान, पालिका शाळेतील शिक्षकांना किमान 50 हजार रुपये पगार आहे. तरीही पटसंख्या वर्षागणिक घटत आहे. मग हे शिक्षक करतात काय? एरवी संघटनेचे पदाधिकारी शिक्षण मंडळ कार्यालयात घुटमळत असतात, मग ते मुलांना शिकवतात कधी असा प्रश्‍न विचारला जात आहे. 

पटसंख्या कमी असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करून जादा शिक्षकांचा इतर शाळांमध्ये समावेश करण्यात येणार आहे. 
-बी.एस.आवारी  प्रशासन अधिकारी 

तरीही शिक्षकांचा तुटवडा 
आरटीईच्या निकषांनुसार 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अपेक्षित आहे. मात्र, महापालिका शाळांमध्ये 40 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक, असे समीकरण ठेवले असतानाही अनेक शाळांमध्ये शिक्षकांचा तुटवडा आहे. 

बंद केलेल्या 39 शाळा 
1) हुतात्मा चापेकर विद्या मंदिर, चिंचवडगाव मुले 1 
2) हुतात्मा चापेकर विद्या मंदिर, चिंचवडगाव कन्या 2 
3) यशवंतराव चव्हाण, थेरगाव मुले क्र. 60/1 
4) यशवंतराव चव्हाण, थेरगाव मुले क्र.60/2 
5) यशवंतराव चव्हाण, थेरगाव कन्या क्र. 60/2 
6) यशवंतराव चव्हाण, थेरगाव कन्या क्र.60/1 
7) पिंपळे निलख मुले क्र. 52 
8) पिंपळे निलख कन्या क्र. 53 
9) संत तुकारामनगर मुले 
10) संत तुकारामनगर कन्या 
11) कमला नेहरू शाळा, पिंपरीनगर मुले 4/2 
12) कमला नेहरू शाळा, पिंपरीनगर कन्या 4/2 
13) पिंपरी चिंचवड महापालिका, खराळवाडी मुले 
14) खराळवाडी कन्या शाळा 
15) महात्मा जोतिबा फुले, चिंचवड स्टेशन मुले क्र.1 
16) महात्मा जोतिबा फुले, चिंचवड स्टेशन मुले क्र.2 
17) पंडित जवाहरलाल नेहरू मुले क्र. 1 
18) पंडित जवाहरलाल नेहरू मुले क्र. 2 
19) पंडित जवाहरलाल नेहरू कन्या क्र.1 
20) पंडित जवाहरलाल नेहरू कन्या क्र.2 
21) निगडी मुले क्र. 2/1 
22) निगडी कन्या शाळा क्र. 2/1 
23) पिंपरी-चिंचवड महापालिका, निगडी मुले क्र. 2/2 
24) प्राथमिक निगडी कन्या क्र. 2/2 
25) छत्रपती राजश्री शाहू प्राथमिक शाळा, कासारवाडी मुले क्र.1 
26) छत्रपती राजश्री शाहू प्राथमिक शाळा, कासारवाडी कन्या क्र.1 
27) पिंपरी-चिंचवड महापालिका बोपखेल शाळा क्र. 101 
28) पिंपरी चिंचवड बोपखेल कन्या शाखा क्र.102 
29) हुतात्मा भगतसिंग विद्या मंदिर, दापोडी मुले क्र.37 
30) हुतात्मा भगतसिंग विद्या मंदिर, दापोडी मुले क्र.76 
31) हुतात्मा भगतसिंग विद्या मंदिर, दापोडी कन्या क्र.31 
32) हुतात्मा भगतसिंग विद्या मंदिर, दापोडी कन्या क्र.53 
33) हुतात्मा भगतसिंग विद्या मंदिर, दापोडी कन्या क्र.73 
34) पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर प्राथमिक शाळा, सांगवी मुले व कन्या क्र. 49 
35) पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर प्राथमिक शाळा, सांगवी मुले व कन्या क्र. 50 
36) शेवंताबाई खंडुजी जगताप प्राथमिक वैदुवस्ती मुले 58/1 
37) शेवंताबाई खंडुजी जगताप प्राथमिक वैदुवस्ती कन्या मुले शाळा क्र. 58/2 
38) कमला नेहरू हिंदी कन्या, पिंपरीनगर 
39) कमला नेहरू मुले, पिंपरीनगर