महापालिका शाळांत दहा वर्षांत तेरा हजार विद्यार्थी झाले कमी

आशा साळवी 
बुधवार, 19 जुलै 2017

पिंपरी -  गुणात्मक दर्जा ढासळल्याने महापालिका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या झपाट्याने घसरली आहे. गेल्या दहा वर्षांत सुमारे साडेतेरा हजार विद्यार्थ्यांनी पट खाली आला. दरम्यान, पटसंख्या कमी होत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यासाठी खरेदीचा आकडा फुगत चालला आहे. 

शहरात सध्या महापालिकेच्या १२८ प्राथमिक शाळा असून थरमॅक्‍स कंपनी इंग्रजी माध्यमाच्या पाच शाळा चालवीत आहे. २००७ मध्ये ५० हजार १९६ विद्यार्थिसंख्या होती. 

सद्यःस्थितीत २०१६-१७ मध्ये ३६ हजार ५४२ विद्यार्थी राहिले आहेत. महापालिकेने विद्यार्थी आणि शिक्षक व आस्थापना खर्चासाठी २०१६-१७ मध्ये १५१ कोटीचे बजेट शिक्षण मंडळासाठी मंजूर केले आहे. 

इंग्रजी शाळांकडे कल, आरटीई प्रवेश प्रक्रिया आणि स्थलांतरित विद्यार्थ्यांमुळे महापालिका शाळांची संख्या कमी झाली आहे. खासगी शाळांशी स्पर्धा करण्यासाठी या विद्यार्थ्यांना दर्जात्मक शालेय साहित्य मोफत पुरविले जाते.
-बी. एस. आवारी, प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ

आमच्या कार्यकाळात ३७ शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग केले. त्यानंतर ते कमी झाले. बदलत्या शिक्षणप्रणालीनुसार शिक्षकांना अद्ययावत प्रशिक्षण देऊन सर्व शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरू केल्यास व इयत्तानिहाय इंग्रजी संभाषण व संगणकप्रणाली राबवली असती तर पट टिकला असता.
- गजानन चिंचवडे, माजी सदस्य, शिक्षण मंडळ