व्यसन करणाऱ्यांची संख्या चिंताग्रस्त

व्यसन करणाऱ्यांची संख्या चिंताग्रस्त

पिंपरी - मानसिक ताण हलका करण्यासाठी अनेकजण व्यसनाचा आसरा घेतात. कालांतराने ही नित्याची सवय बनते. गेल्या काही वर्षांपासून व्यसन करणाऱ्यांची संख्या प्रत्येक वर्षी ३० टक्‍क्‍यांनी वाढत आहे. यामध्ये किशोरवयीन मुलांबरोबरच आयटीमध्ये काम करणाऱ्यांचा समावेश असल्याचे विमल फाउंडेशनतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पुढे आले आहे. 

बदलत्या जीवनशैलीमुळे मानसिक ताण, नैराश्‍य, कमजोर मानसिकता यामध्ये वाढ होत आहे. त्यामधून सुटण्यासाठी व्यसन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याखेरीज विभक्‍त कुटुंब पद्धत याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत असल्याचे निरीक्षण या सर्वेक्षणातून नोंदवण्यात आले आहे. 

किशोरवयीन मुले संगतीमुळे व्यसनांकडे ओढली जातात. पालकांचे दुर्लक्षही त्याला कारणीभूत ठरते. पंक्‍चर सोल्यूशन, व्हाइटनर बाजारात सहजपणे उपलब्ध होत असल्यामुळे त्याचे व्यसन करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. आयटी कंपनीमधील तरुण कामाचा ताण हलका करण्यासाठी व्यसनांचा आधार घेतात. सुरवातीला विकेंडच्या पार्ट्यांमधून त्याची सुरवात होते. त्यानंतर कामाचा ताण वाढला की, तो हलका करण्यासाठी दारू पिणे, अमली पदार्थाचे सेवन करण्यास सुरवात होते. कालांतराने ही नित्याची बाब होऊन जाते. कालांतराने चूक लक्षात आल्यानंतर त्यामधून बाहेर पडण्यासाठी ते प्रयत्न करतात, असेही या निरीक्षणातून दिसून आले आहे.

तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी त्यांच्याकडे सर्वाधिक लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. व्यसनातून बाहेर पडतानादेखील आई-वडिलांचे योगदान महत्त्वाचे ठरणारे असते. अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी व्यसनमुक्‍ती केंद्रे सुरू झाली आहेत. व्यसनांकडे वळणाऱ्यांच्या प्रमाणात त्यातून बाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण निम्मेच असल्याचे या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. 
- विल्यम साळवे, अध्यक्ष, विमल फाउंडेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com