अत्तराचा दरवळ अन्‌  शिरखुर्म्याचा आस्वाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

पिंपरी - नवीन पठाणी पेहराव, डोक्‍यावर टोपी, अत्तराचा दरवळ अन्‌ शिरखुर्म्याचा आस्वाद... अशा आनंदी वातावरणात पिंपरी- चिंचवड शहरात हजारो मुस्लिम बांधवांनी रमजान ईदनिमित्त नमाजपठण करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

पिंपरी- चिंचवड शहरातील सुमारे ८० मशिदींमध्ये सोमवारी  रमजान ईद साजरी झाली. चिंचवड, काळेवाडी, आकुर्डी, निगडी, चिखली, भोसरी, थेरगाव, खराळवाडी, मोरवाडी, रूपीनगर आदी ठिकाणच्या मशीद आणि ईदगाह मैदानांवर सकाळीच मुस्लिम बांधवांनी नमाजपठण केले. शुभेच्छा देऊन भेटवस्तूंची देवाण-घेवाण केली. मौलवी व अंजुमन पदाधिकाऱ्यांनी एकोप्याचा संदेश दिला. गरिबांना धान्य किंवा गोड पदार्थांचे गाठोडे ‘फितरा’ दिले. हिंदू बांधवांनीही शुभेच्छा दिल्या.