कासारवाडीत वाहतुकीत बदल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

पिंपरी- नाशिक फाटा उड्डाण पुलाजवळ मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू होणार असल्यामुळे पुण्याहून पिंपरीकडे जाणाऱ्या वाहनांनी मंगळवारपासून (ता. 29) सेवा रस्त्याऐवजी मुख्य रस्त्याने नाशिकफाटा चौकाकडे जावे, असे आवाहन महामेट्रोने केले आहे. 

पिंपरी- नाशिक फाटा उड्डाण पुलाजवळ मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू होणार असल्यामुळे पुण्याहून पिंपरीकडे जाणाऱ्या वाहनांनी मंगळवारपासून (ता. 29) सेवा रस्त्याऐवजी मुख्य रस्त्याने नाशिकफाटा चौकाकडे जावे, असे आवाहन महामेट्रोने केले आहे. 

कासारवाडी भुयारी मार्गाजवळ पहिल्यांदा काम सुरू करण्यात येईल. त्यामुळे, पुण्याकडून कासारवाडी, सांगवी, पिंपळे गुरवकडे जाणाऱ्या दुचाकी, हलक्‍या चार चाकी वाहनांनी, तसेच पीएमपी बसगाड्यांनी सेवा रस्त्याचा वापर करावा. अन्य सर्व वाहनांनी पिंपरी, भोसरीकडे जाण्यासाठी सॅंडविक कंपनीजवळील सेवा रस्त्यावरून ग्रेड सेपरेटरच्या मुख्य रस्त्यावर जावे व तेथून पुढील रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन महामेट्रोचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक गौतम बिऱ्हाडे यांनी केले. या परिसरात वाहनांची पार्किंग करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

कासारवाडी भुसारी मार्गाजवळ बीआरटी मार्गात महामेट्रोने मायक्रोपायलिंगचे काम सुरू केले आहे. त्यामुळे कासारवाडी भुयारी मार्गाच्या रॅम्पच्या भरावाला भक्कम आधार मिळेल. त्यानंतर मेट्रोच्या खांबांसाठी पाया घेण्याचे काम सुरू केले जाईल. नाशिकफाटा दुहेरी उड्डाण पुलामुळे मेट्रोचा मार्ग थोडे वळण घेऊन मार्गस्थ होईल. तेथे सुमारे नऊशे मीटर अंतरात तीस खांब उभारण्यात येणार आहेत. 

वाहनांच्या मार्गात बदल केल्यानंतर आठवडाभर त्याची पाहणी करण्यात येईल. गरजेनुसार त्यात सुधारणा केल्या जातील. त्यानंतर मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात केली जाईल, असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: pimpri news Traffic change in kasarwadi