गर्भपात करण्यास नकार देणाऱ्या डॉक्‍टरवर हल्ला करणाऱ्याला अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

पिंपरी - पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या एका युवतीचा गर्भपात करण्यास नकार दिला म्हणून पिंपळे गुरव येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अमोल बिडकर यांच्यावर शनिवारी (ता. 9) रात्री हल्ला झाला होता. यातील आरोपीला अटक केली असून त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. 

सिद्धार्थ साजन सूर्यवंशी (वय 21 रा. महादेवआळी, खडकी बाजार) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तरुणीचा गर्भपात करण्यासाठी डॉ. बिडकर यांच्याकडे संशयित आरोपीने अनेकदा तगादा लावला. मात्र त्यांनी नकार दिला. शनिवारी रात्री याबाबत डॉक्‍टर व संशयित यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी संशयित व त्याच्या साथीदारांनी डॉक्‍टरवर धारदार हत्याराने हल्ला केला. असे फिर्यादीत म्हटले आहे.