पिंपरी महापालिकेकडून सांडपाणी थेट मुळा नदीत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

पिंपरी - शहरातील सांडपाणी पवना आणि इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे. मात्र आता मुळा नदीतही सांडपाणी सोडले जात असल्याचा धक्‍कादायक प्रकार ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत उघडकीस आला आहे. मुळा नदीत आता राडारोड्यासह सांडपाणीही सोडण्यात येत असल्याने तिची गटारगंगा झाली आहे. 

शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्या वाहतात. नद्यांचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून सामाजिक संस्थांसह पर्यावरणप्रेमी प्रयत्नशील आहेत. मुळा नदी यापासून वाचल्याचे बोलले जात होते. मात्र आता मुळा नदीतही थेट सांडपाणी सोडले जात आहे. 

शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तरीदेखील काही ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया न करता हे पाणी थेट नदीत सोडले जाते. निलख परिसरात नदीपात्रात राडारोडा टाकण्यात येत असल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. २९) सकाळने उघडकीस आणल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. आता मुळा नदीत थेट सांडपाणी सोडले जात असल्याचेही उघड झाले आहे. यामुळे मुळा नदीही प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे दिसून आले आहे.

मुख्यमंत्र्यांनीही केली होती टीका
पवना नदीकिनारी मोरया गोसावी मंदिर हे तीर्थक्षेत्र आहे. तर इंद्रायणी नदी किनारी आळंदी हे तीर्थक्षेत्र आहे. भाविक याच नदीतील पाण्याचा उपयोग करतात. ‘‘नदी प्रदूषणाचे पाप पिंपरी चिंचवडकरांचे आहे,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदी येथील भाषणात सांगितले होते.