शिक्षण समितीच्या निवडीची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

पिंपरी - महापालिका शिक्षण समितीसाठी अद्याप सदस्यनिवडीची प्रतीक्षा कायम आहे. समितीचे अधिकार काय असतील, समितीत किती सदस्य असतील, याबाबतचा निर्णय प्रशासकीय स्तरावर घेतला जाणार आहे. त्यानंतर हा प्रस्ताव आयुक्तांकडून विधी समिती किंवा थेट सर्वसाधारण सभेत ठेवला जाऊ शकतो. 

महापालिका शिक्षण मंडळाची मुदत एक जूनला संपुष्टात आली. त्यानंतर महापालिका स्तरावर नगरसेवकांची शिक्षण समिती गठित होणे आवश्‍यक होते. जून आणि जुलै असे दोन महिने उलटल्यानंतरही अद्याप याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. 

सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘शिक्षण समितीचे लवकरच गठन केले जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव विधी समितीकडे किंवा थेट सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवला जाईल.’’ सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे म्हणाले, ‘‘शिक्षण समितीचे अधिकार व कार्यकक्षा याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेतल्यानंतर तसा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला जाईल.’’ नगरसचिव उल्हास जगताप म्हणाले, ‘‘शिक्षण समितीत नऊ नगरसेवकांना पक्षीय बलाबलानुसार संधी मिळणार आहे. विषय समितीप्रमाणेच ही समिती असेल. मात्र, त्याबाबतचा प्रस्ताव अद्याप प्रशासनाकडून आलेला नाही.’’