नऊ ऑगस्टपासून आठ क्षेत्रीय कार्यालये

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेची आठ क्षेत्रीय कार्यालये सुरू करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात चार निवडणूक प्रभागांचे कामकाज चालणार आहे. ही आठही क्षेत्रीय कार्यालये क्रांतिदिनापासून म्हणजे ९ ऑगस्टपासून अस्तित्वात येणार आहेत. त्यानुसार सर्व विभागांनी कामकाज करावे, असे आदेश आयुक्त हर्डीकर यांनी दिले आहेत.

महापालिका कामकाजासाठी १९९७ मध्ये चार प्रभाग कार्यालयांची निर्मिती करण्यात आली होती. तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दोन प्रभाग कार्यालयांची निर्मिती केली. या सहा प्रभागांना क्षेत्रीय कार्यालय संबोधण्यात येते. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर कार्यालयांची फेररचना करून सहाऐवजी आठ क्षेत्रीय कार्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव २० एप्रिल २०१७ रोजी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे.

क्षेत्रीय कार्यालयांचे कार्यक्षेत्र
अ : भेळ चौक, प्राधिकरण : प्रभाग १० (संभाजीनगर), प्रभाग १४ (मोहननगर, आकुर्डी), प्रभाग १५ (प्राधिकरण) आणि प्रभाग १९ (आनंदनगर, भाटनगर).
ब : एल्प्रो कंपनी आवार, चिंचवड : प्रभाग १६ (रावेत), प्रभाग १७ (बिजलीनगर, चिंचवडेनगर), प्रभाग १८ (चिंचवड), प्रभाग २२ (काळेवाडी).
क : हॉकी स्टेडियमजवळ नेहरूनगर : प्रभाग २ (बोऱ्हाडेवाडी), प्रभाग २ (धावडेवस्ती), प्रभाग ८ (इंद्रायणीनगर) आणि प्रभाग ९ (नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा).
ड : रहाटणी : प्रभाग २५ (वाकड), प्रभाग २६ (पिंपळे निलख), प्रभाग क्रमांक २८ (पिंपळे सौदागर) आणि प्रभाग २९ (पिंपळे गुरव).
इ : पांजरपोळ संस्थेसमोर, भोसरी : प्रभाग ३ (चऱ्होली), प्रभाग ४ (दिघी), प्रभाग ५ (गवळीनगर) आणि प्रभाग ७ (भोसरी गावठाण).
फ : प्राधिकरणाची जुनी इमारत, टिळक चौक, निगडी : प्रभाग १ (चिखली), प्रभाग  ११(कृष्णानगर), प्रभाग १२ (तळवडे-रुपीनगर) आणि प्रभाग १३ (यमुनागनर, सेक्‍टर क्रमांक ).
ग : करसंकलन कार्यालय थेरगाव : प्रभाग २१(पिंपरीगाव), प्रभाग २३ (थेरगाव), प्रभाग २४ (गणेशनगर) आणि प्रभाग २७ (रहाटणी).
ह : महिला आयटीआय इमारत, कासारवाडी : प्रभाग २० (संत तुकारामनगर-कासारवाडी), प्रभाग ३० (दापोडी-फुगेवाडी-कासारवाडी), प्रभाग ३१ (नवी सांगवी) आणि प्रभाग ३२ (सांगवी).