मेट्रोच्या कामाला जानेवारीत सुरवात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान २०२१ मध्ये धावणार; साडेसहा हजार कोटी खर्च

पिंपरी - हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यानच्या प्रस्तावित मेट्रो प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला जानेवारी २०१८ मध्ये सुरू होण्याची शक्‍यता आहे. ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’नुसार हा उपक्रम राबवण्यात येणार असून, एप्रिल २०२१ पर्यंत या मार्गावरील मेट्रो सुरू होणार आहे. 

हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान २०२१ मध्ये धावणार; साडेसहा हजार कोटी खर्च

पिंपरी - हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यानच्या प्रस्तावित मेट्रो प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला जानेवारी २०१८ मध्ये सुरू होण्याची शक्‍यता आहे. ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’नुसार हा उपक्रम राबवण्यात येणार असून, एप्रिल २०२१ पर्यंत या मार्गावरील मेट्रो सुरू होणार आहे. 

या प्रकल्पासाठीची निविदा २२ जून रोजी खुली होणार आहे. त्यानंतर निविदा प्रक्रियेतील सोपस्कार पूर्ण करण्यात येणार असून, सहा महिन्यांत हे काम सुरू करण्यात येणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यानच्या मेट्रोचा मार्ग २३.३ किलोमीटरचा राहणार असून, या मार्गावर २३ स्टेशन्स असतील. संपूर्ण मेट्रो प्रकल्प एलिव्हेटेड होणार असल्यामुळे या त्यासाठी कमी प्रमाणात भूसंपादन करावे लागणार आहे. हिंजवडी, मेगापोलिस, विप्रो, शिवाजी चौक, वाकड उड्डाण पूल, बालेवाडी स्टेडियम, मिटकॉन, विद्यापीठ चौक या मार्गे शिवाजीनगरकडे जाणार आहे. या उपक्रमासाठी साडेसहा हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यानचा मेट्रो मार्ग एलिव्हेटेड राहणार असल्याने सर्व स्थानके वरील बाजूस राहणार आहेत. सर्व स्टेशन्स चार हजार चौरस मीटर जागेत उभी करण्यात येणार आहेत. प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांना उतरण्यासाठी आणि वाहनांच्या पार्किंगसाठी थोड्या फार प्रमाणात जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. 

या मेट्रोचा डेपो हिंजवडीमध्येच उभारण्यात येणार असून त्यासाठी आवश्‍यक असणारी ५० एकर जागा एमआयडीसी उपलब्ध करून देणार आहे. हिंजवडीमध्ये असणाऱ्या आयटी कंपनीमध्ये जाणारा कर्मचारी वर्ग मोठा आहे. सध्या शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने अनेकजण आपली वाहने घेऊन त्या ठिकाणी जातात. प्रामुख्याने सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. या मार्गावर मेट्रो सुरू झाल्यानंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होणार आहे. 

हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान प्रस्तावित असणाऱ्या मेट्रो मार्गाच्या निविदा प्रक्रियेचे काम सध्या सुरू आहे. पुढील वर्षात मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल आणि एप्रिल २०२१ पर्यंत मेट्रो प्रकल्प कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 
- किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमआरडीए

पुणे

पुणे  - शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालये, तसेच जिल्ह्यात मंडलस्तरावर आधार नोंदणी केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम...

02.33 AM

पिंपरी - गुरुवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील वातावरण उत्सवमय झाले आहे. घराघरात घट बसविण्याची तसेच...

02.30 AM

पुणे -  ""वयाच्या 25 वर्षांपर्यंत मी कधीही रुग्णालयाची पायरी चढले नाही; पण अचानकच मला आजार झाला. डॉक्‍टरांच्या तपासणीत...

02.30 AM