घोषणांचा सुकाळ अंमलबजावणीचा दुष्काळ

घोषणांचा सुकाळ अंमलबजावणीचा दुष्काळ

भोसरी मतदारसंघातील बफर झोनची हद्द कमी करणे, बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळविलेला भक्‍कम पाठिंबा, शास्तीकर माफी आणि अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणाच्या लढ्याला आलेले यश या लांडगे यांच्या जमेच्या बाजू आहेत. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी नागपूर येथील अधिवेशनात त्यांनी लक्षवेधी सूचना मांडली. कुंटे समितीने दिलेल्या अहवालानुसार आता बांधकामे नियमित होणार आहेत. 

विधानसभेतील कामकाज
पिंपरी- चिंचवड शहरातील विविध प्रश्‍नांबाबत विधिमंडळात १५० हून अधिक तारांकित प्रश्‍न उपस्थित केले. याशिवाय ५० लक्षवेधी सूचना, १५ औचित्याचे मुद्दे मांडत जनतेच्या प्रश्‍नांना वाचा फोडली. 

आमदार निधीतून केलेली महत्त्वाची कामे
मतदार संघात रात्र अभ्यासिका बांधणे, सामाजिक सभागृह उभारणी, स्वच्छतागृहांची उभारणी, रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, व्यायामशाळांची उभारणी, उद्यान विकसित करणे, बसथांबा शेड उभारणे या सह विविध कामे पूर्ण कामे करण्यास यशस्वी ठरले.

अंमलबजावणी नाही?
अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय झाला, तर त्याची अंलबजावणी होताना दिसत नाही. घरे अधिकृत होणार असतील तर शास्तीकर भरण्याची गरजच काय, पूर्ण शास्तीकर माफ व्हावा, अशी आमची सुरवातीपासूनची मागणी आहे. बफर झोनची हद्द कमी केली तर मग किती बांधकामांना तिथे परवानगी मिळाली? माझ्या कार्यकालामध्ये दिघी आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यांना मंजुरी मिळविली आहे.
- विलास लांडे, राष्ट्रवादीचे नेते

पूर्ण कामे
बफर झोनची हद्द ५०० मीटरवरून १०० मीटरवर आणली
अनधिकृत बांधकामाचा प्रश्‍न मार्गी लावला
वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे काम मार्गी लावले
पुणे-आळंदी महामार्गाचे रुंदीकरण केले
एमआयडीसी, दिघी पोलिस ठाण्यांना इमारती
बैलगाडा शर्यतीसाठी केंद्र सरकारचा पाठिंबा मिळविला
नागरिकांसाठी परिवर्तन हेल्पलाइन सुरू
 

अपूर्ण कामे
पुण्यातील नामांकित महाविद्यालये शहरात आणणे
पिंपरी- चिंचवड शहर पोलिस आयुक्‍तालय 
आंद्रा व भामा आसखेड धरणांतून पाणी योजना पूर्ण करणे
चिखली येथे संतपीठ तसेच अद्ययावत रुग्णालय उभारणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com