स्वतःच्या घराचे स्वप्न साकारण्याची सुवर्णसंधी

स्वतःच्या घराचे स्वप्न साकारण्याची सुवर्णसंधी

चिंचवडमध्ये सात व आठ ऑक्‍टोबर रोजी ‘सकाळ’ वास्तू प्रदर्शन २०१७ 
पिंपरी - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘सकाळ’ वास्तू प्रदर्शन २०१७ येत्या सात व आठ ऑक्‍टोबर रोजी संपन्न होत आहे. दिवसेंदिवस विस्तारत चाललेल्या या औद्योगिकनगरीमध्ये स्वतःचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते.

त्यांच्यासाठी ही एक पर्वणीच आहे. दीपावलीच्या सुरवातीला आयोजित प्रदर्शनात शहर व परिसरातील अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिक सहभागी होणार आहेत. ‘महारेरा घरांचा उत्सव’ हे या प्रदर्शनाचे प्रमुख वैशिष्ट्ये आहे. त्यांच्यापैकी काहींच्या प्रदर्शनाविषयी या बोलक्‍या प्रतिक्रिया 

दीपावलीत गृहस्वप्न साकाराच 
रेरा कायदा, जीएसटी यानंतर शहरात प्रथमच ‘सकाळ वास्तू प्रदर्शन’ होत असून सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाला परवडणारे ते अगदी उच्चवर्गीय ग्राहकांसाठी विविध गृहप्रकल्प या प्रदर्शनात समाविष्ट असतात. बदलत्या जीवनशैलीच्या अनुषंगाने असलेले विविध गृहप्रकल्प पाहण्यासाठी आवर्जून भेट देण्यासारखे हे प्रदर्शन असते. आपल्या परिवारासह नक्की या प्रदर्शनाला भेट द्या.
- सचिन कुकरेजा, संचालक मिलेनियम डेव्हलपर्स 

गृहप्रवेशाची सुवर्णसंधी
घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकाच छताखाली विविध पर्याय उपलब्ध असलेल्या या वास्तू प्रदर्शनाला पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकांनी भेट द्यावी. घर घेणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, सणांच्या या दिवसांत आपला आनंद द्विगुणित करण्याची ही पर्वणी असणार आहे. ‘सकाळ’ने बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यासाठी हे दालन उपलब्ध करून दिले आहे. उत्सव होम्सने या प्रदर्शनानिमित्त नो जीएसटी ही ऑफर खास ग्राहकांसाठी दिली आहे. या प्रदर्शनात घराची नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना भेट, उत्सव होम यांचेकडून देण्यात येणार आहे.
- सतीश बन्सल, संचालक उत्सव होम्स 

स्वतःच्या घरात लक्ष्मीपूजनाची संधी
रेरा कायदा व जीएसटी नंतर शहरात प्रथमच ‘सकाळ’च्या वतीने वास्तू प्रदर्शन संपन्न होत आहे. रेरा नोंदणीकृत बांधकाम व्यावसायिकांचा समावेश या प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये असून या प्रदर्शनाच्या निमित्ताने सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता असलेले गृहप्रकल्पांची माहिती ग्राहकांना मिळणार आहे. या दिवाळीत आपल्या स्वतःच्या घरात लक्ष्मीपूजन करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. बदललेले आर्थिक धोरण, कमी झालेले व्याजदर यामुळे सध्या ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 
- सुजित पाटील, सह्याद्री प्रॉपर्टीज 

सर्व स्तरातील ग्राहकांसाठी उपयुक्त
जीएसटी व रेरा कायदा लागू झाल्यानंतर पारदर्शी व्यवहार व उत्तम दर्जाचे गृहप्रकल्प पाहण्याची व आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची उत्तम संधी प्रदर्शनामुळे ग्राहकांना मिळाली आहे. यामुळे दिवाळीपूर्वी आपल्या पसंतीचे घर घेण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्राहकांना मिळणार आहे. कमी झालेले व्याजदर व स्थिर मार्केट दर या अनुषंगाने हे प्रदर्शन उपयुक्त आहे. मध्यमवर्गीयांपासून उच्चवर्गीय गटासाठी परवडणारे दर असलेले गृहप्रकल्प या प्रदर्शनात पहावयास मिळणार आहेत. अनेक प्रश्‍नांची उत्तरे या प्रदर्शनाला भेट देवून मिळणार आहेत.
- पियुष जमतानी, संचालक, जे. जे. ग्रुप 

दर आणि दर्जाची उत्तम सांगड
आपला वास्तू योग असावा लागतो, असे म्हणतात आणि हा योग ‘सकाळ’ वास्तू प्रदर्शनामुळे पिंपरी- चिंचवडकरांसाठी आला आहे. योग्य वेळी योग्य ठिकाणी होत असलेल्या या प्रदर्शनाला ग्राहकांनी भेट देण्यासारखे वातावरण आहे. दर आणि दर्जा यांची उत्तम सांगड असलेल्या या प्रदर्शनात परवडणाऱ्या गृहप्रकल्पांची माहिती मिळणार आहे. या संधीचा फायदा ग्राहकांनी घ्यावा.
- अमोल भोंडवे, संचालक, इलाईट असोसिएट्‌स 

गुंतवणुकीसाठी उत्तम परिसर
पवनानगर चिंचवड व विकासनगर किवळे या परिसरामध्ये अनेक उच्च दर्जाची घरे आमच्या गृहप्रकल्पात ग्राहकांना पहावयास मिळणार आहेत. नवीन घरासाठी किंवा गुंतवणुकीसाठी हा परिसर अत्यंत उत्तम आहे. दळणवळणाची साधने यामुळे या परिसरात घर घेऊ इच्छिणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आमच्या सर्व गृहप्रकल्पामध्ये ग्राहकांच्या दृष्टीने सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. अनेक वर्षांपासून ग्राहकांचे हित जोपासत त्यांना हवे असणाऱ्या सुविधांसाठी आम्ही कार्यरत आहोत. या प्रदर्शनाच्या निमित्ताने पिंपरी- चिंचवड परिसरातील ग्राहकांना आपल्या घराचे स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधीच मिळणार आहे.
- सुधीर वाडेकर, संचालक, समृद्धी ग्रुप

योग्य गुंतवणुकीची संधी
पिंपरी- चिंचवड शहर हे पुणे शहराइतकेच विस्तारत आहे. त्यामुळे ग्राहकांना एक पर्याय उपलब्ध झाला आहे. योग्य गुंतवणुकीची तसेच स्वतःची वास्तू साकारण्याची ही नामी संधी ‘सकाळ’ वास्तू प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्राहकांना मिळणार आहे. रेरा कायदा व जीएसटीनंतर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. आपल्या स्वप्नातील घर साकारण्यासाठी ही योग्य वेळ आहे. सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारी घरे हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये आहे. 
- सुरेश जुमानी, शिव असोसिएट्‌स

इमर्जिंग सिटीमध्ये हक्काचे घर
‘सकाळ’ वास्तू प्रदर्शनाला ग्राहक वर्गामध्ये निश्‍चितच मानाचे स्थान आहे. नोटाबंदी, वस्तू व सेवा कर आणि रेरा कायदा अंमलबजावणीच्या पार्श्‍वभूमीवर सदनिका विक्रीमध्ये वाढ होणे सकारात्मक असले, तरी मी रेरा कायद्याचे स्वागत करतो. पिंपरी- चिंचवड शहर भविष्यातील इमर्जिंग सिटी म्हणून उदयास येणार असल्याने बेस्ट पिंपरी- चिंचवड गृहबांधणी क्षेत्रात ग्राहकांनी केलेली गुंतवणूक फायद्याची असणार आहे. ग्राहकांना सर्वोत्तम देण्याची आस पारदर्शकता विश्‍वास याच बळावर भूमी परिवारात आपणांस या दीपावलीमध्ये सदस्य करण्यात आम्ही इच्छुक आहोत. 
- पंकज येवला, व्यवस्थापकीय संचालक, भूमी इन्फ्राकॉन 

सकाळ वास्तू प्रॉपर्टी एक्‍स्पो
कधी - ७ व ८ ऑक्‍टोबर
कुठे - ऑटोक्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटर, चिंचवड
वेळ - सकाळी ११ ते रात्री ८
सुविधा - प्रवेश व पार्किंग मोफत
अधिक माहितीसाठी संपर्क ः ९५४५९५४७३३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com