पिंपरी शहरातील प्रश्‍नांबाबत मुख्यमंत्र्यांची काय असेल भूमिका?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

पिंपरी - शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्‌घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या १२ ऑगस्टला शहरात येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात शहरातील विविध प्रश्‍नांबाबत ते काय भूमिका घेतात, याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे.

महापालिकेत पहिल्यांदाच भाजपची एकहाती सत्ता आली. भाजपची सत्ता येऊन पाच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. महापालिकेत अर्थसंकल्प सादर करण्यास यंदा जून महिना उजाडला. त्यामुळे शहरातील विकासकामांचा वेग संथ आहे. हा वेग वाढविण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून प्रयत्न अपेक्षित आहेत. 

शहरातून जाणाऱ्या रिंग रस्त्याचा प्रश्‍न हा कळीचा मुद्दा बनला आहे, त्यामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांचा रिंग रस्त्याला विरोध आहे. रिंग रस्त्यात बाधित होणाऱ्या नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून घरे पाडू नका, अशी मागणी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘निगडीतील भक्ती-शक्ती चौकात महापालिकेच्या वतीने ग्रेड सेपरेटर आणि उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे, त्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होईल. त्याशिवाय, विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि भूमिपूजन नियोजित आहे. रिंग रस्त्याच्या प्रश्‍नाबाबत देखील या वेळी मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करण्यात येणार आहे. रिंग रस्त्याच्या आरक्षणाला पर्याय देता येईल का, याविषयी या वेळी चर्चा होईल.’’