ई-पॉसवरून आता मिळणार बॅंकिंग सेवा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

पुणे - स्वस्त धान्य वितरण केंद्रांमध्ये साखर, गहू, तांदूळ आणि रॉकेलसह गॅस सिलिंडरदेखील मिळणार आहे; परंतु त्यापुढे जाऊन ‘ई-पॉस’ मशिनवरून वीजबिल, टेलिफोन, मोबाईल बिल भरण्यासह अन्य ई-पेमेंट करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी तांत्रिक साह्य ‘येस बॅंके’कडून दिले जाणार आहे. यासाठी प्रशिक्षणदेखील देण्यात येणार आहे.  

जिल्ह्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी दिलीप भालेदार म्हणाले, ‘‘ई-पॉसवरून धान्य, साखर आणि रॉकेल वितरणासह ई-पेमेंटसाठी परवानगी राज्य शासनाकडून देण्यात आली आहे. त्यासाठी एका खासगी बॅंकेकडून तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विविध बिले भरल्यानंतर संबंधित केंद्रचालकाला सेवा शुल्क मिळू शकणार आहे. 

त्यामुळे केंद्रचालकांना अतिरिक्त उत्पन्न स्रोत मिळू शकणार आहे. स्वस्त धान्य वितरण केंद्र हे बॅंकिंग सेवा केंद्र देखील बनावे हा यामागचा उद्देश आहे.’’

प्रशिक्षण देणार
दौंड आणि हवेलीतील दोन केंद्रांवर प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी चाचणी झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये मागणीनुसार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकांना ऑनलाइन ई पेमेंट सुविधेमुळे पायपीट वाचेल.