‘टॅग’मुळे महामार्गावर वाहने ‘फास्ट’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

पुणे - गेल्या काही महिन्यांपासून केवळ चर्चेत असलेली फास्ट टॅग योजना अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून राबविण्यास सुरवात झाली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील (क्र.६५) पाटस व सरडेवाडी, तसेच पुणे-सातारा महामार्गावरील (क्र.४८) खेड-शिवापूर व आनेवाडी पथकर नाक्‍यावर फास्ट टॅग योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता टोल नाक्‍यावर जाणाऱ्या वेळेची बचत होणार असून वाहतूक अधिक गतिमान होईल.

वेळेची बचत होणार
टोल नाक्‍यावरील वाहनांची गर्दी आणि त्यातून होणारा विलंब हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. टोल वसुलीसाठी कंपनीकडून कोणतीच आधुनिक यंत्रणा वापरली जात नसल्याने प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. शनिवारी आणि रविवारी तर टोल नाक्‍यावर अर्धा तास थांबावे लागते. या समस्येवर फास्ट टॅग ही सुविधा राबविण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला होता.

फास्ट टॅग वापरण्याचे आवाहन
टोल शुल्काचा आगाऊ भरणा करून नागरिकांना फास्ट टॅग उपलब्ध करून दिला जाणार आहे. हा टॅग गाडीवर समोरच्या बाजूला लावणे अपेक्षित आहे. यात प्रवाशांनी कितीवेळा टोल नाक्‍यावर ये-जा केले त्यावरून त्यांच्या बॅंकखात्यातून परस्पर टोलची 
रक्कम कपात करण्याची सुविधा आहे. तसेच पुन्हा पैसे भरून हा टॅग रिचार्ज करता येणार आहे. 

टोल नाक्‍यावर ऑनलाइन रिचार्ज करण्याची सुविधादेखील उपलब्ध असणार आहे. फास्ट टॅग लावलेल्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी फास्ट टॅग सुविधेचा वापर करून टोलवरील वेळ वाचवावा, असे आवाहन राष्ट्रीय राजमार्गाचे 
प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी केले आहे.

अशी असेल सुविधा
 फास्ट टॅग लावलेल्या वाहनांसाठी सर्व टोल नाक्‍यांवर स्वतंत्र लेन.
 वाहन टोल नाक्‍यावर प्रवेश करताच ॲटोमॅटिक बूमच्या सह्याने वाहनाला ग्रीन सिग्नल.
 टोल नाक्‍यावरून पास होताच एसएमएसद्वारे प्रवाशांना मोबाईलवर टोलवसुलीची माहिती मिळणार.
 टॅगमध्ये किती रक्कम शिल्लक आहे, किती कपात झाली याचीही माहिती मिळणार.
फास्ट टॅगचे फायदे
 टोल नाक्‍यावर रांगेत थांबणे, पैसे देणे, यासाठी वेळ घालविण्याची गरज नाही.
 परिणामी वेळ आणि इंधनाची बचत होणार. 
 विशेषत: फास्ट टॅग असलेल्या वाहनांना टोलच्या दरामध्ये साडेसात टक्के कॅशबॅक सवलत दिली जाणार आहे.

Web Title: pune news Fast tags Khed shivapur toll naka