पुणे: वडगाव आनंद येथे मोटारीला आग; तिघांचा होरपळून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

पुण्यावरून घरी परतत असताना वडगाव आनंद येथे मध्यरात्री दीडच्या सुमारास मोटारीने अचानक पेट घेतला. या मोटारीतून जात असलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. मोटार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

पुणे - जुन्नरजवळ आळेफाटा हद्दीत वडगाव आनंद येथे मध्यरात्री दीडच्या सुमारास मोटारीने अचानक पेट घेतल्याने मोटारीतील तिघांचा होरपळून मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यावरून घरी परतत असताना वडगाव आनंद येथे मध्यरात्री दीडच्या सुमारास मोटारीने अचानक पेट घेतला. या मोटारीतून जात असलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. मोटार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. दिलीप नवले, नरेश वाघ, बेटी चासकर अशी मृतांची नावे आहेत.

मोटारीने पेट घेतला तेव्हा यांना मदत मिळू शकली असती तर ते बचावले असते, असे सांगण्यात येत आहे. यावेळी रस्त्यावरून अनेक वाहने जात होती. मात्र, वेळीच मदत न मिळाल्याने तिघांचाही मृत्यू झाला.

टॅग्स