हिंजवडीच्या आयटी कंपनीतील तरुणीचा विनयभंग 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

पुणे/औंध - हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एका नामांकित आयटी कंपनीतील तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्‍कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. हा प्रकार पौड पोलिस ठाण्याच्या हद्दीत चांदे-नांदे परिसरात बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडला. या घटनेमुळे तरुणीला मानसिक धक्‍का बसला असून तिच्यावर बाणेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

चेन्नई येथील 33 वर्षीय तरुणी हिंजवडी येथील एका आयटी कंपनीत कार्यरत आहे. ती कंपनीतील कामकाज संपवून दुपारी स्कूटरवरून घरी जात होती. पाऊस सुरू झाल्यामुळे ती एका झाडाखाली रेनकोट घालण्यासाठी थांबली होती. या वेळी तिला एकटीला पाहून टेंपोतून दोन अनोळखी व्यक्ती तिच्याजवळ आल्या. त्यांनी तिचा विनयभंग केला; परंतु त्या तरुणीने त्यांना विरोध केला. तिने फेवरेट या ऍपवरून मित्र-मैत्रिणींना फोन करून कल्पना दिली. तोपर्यंत त्या रस्त्यावरून जाणाऱ्यांना पाहून ते दोघे तरुण पळून गेले. यानंतर तिच्या सहकारी मित्रांनी तिला घरी आणले. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली नाही; परंतु तिची भेदरलेली अवस्था पाहून मैत्रिणीने तिला शुक्रवारी सकाळी बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले व पोलिसांना हा प्रकार कळविला. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस आयुक्त शशिकांत शिंदे आणि परिमंडळ तीनचे उपायुक्‍त गणेश शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन तरुणीची भेट घेतली. या घटनेचा तपास पुणे शहर आणि ग्रामीण पोलिस करीत आहेत. 

हिंजवडी येथील आयटी कंपनीतील तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार बुधवारी घडला. ही घटना पुणे ग्रामीणच्या हद्दीत घडली आहे; परंतु शहर पोलिसही आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. 
- शशिकांत शिंदे, अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त.