हवाई मालवाहतूक करणे झाले सोपे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

पुणे - लोहगाव विमानतळावर उभारलेल्या हवाई मालवाहतूक केंद्राचे बुधवारी सीमा शुल्क विभागाचे मुख्य आयुक्त ए. के. पांडे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. हे केंद्र सुरू झाल्यामुळे पुण्यातून मध्यपूर्व देशात शेतीमाल, तर युरोप देशात यंत्रसामग्रीची निर्यात करणे सोयीचे होणार आहे. 

यावेळी सीमा शुल्क विभाग, विमानतळ प्राधिकरण, मराठा चेंबरचे पदाधिकारी उपस्थित होते. सध्या पुण्यातून चार आंतरराष्ट्रीय विमानसेवा दुबई, अबुधाबी, फ्रॅंकफर्ट येथे सुरू आहेत. त्यामुळे लोहगाव विमानतळावरून हवाई मालवाहतूक केंद्र सुरू करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. अखेर ती पूर्ण झाली असून हे केंद्र अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त आहे. येथे दररोज चार टन मालाची हाताळणी करणे शक्‍य होणार आहे. हे केंद्र सुरू झाल्यामुळे मुंबई येथून निर्यातीसाठी लागणारा वेळ आणि होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत मोठी बचत होणार आहे. सध्या या केंद्रातून केवळ निर्यातीला परवानगी दिली असून लवकरच आयातीसही परवानगी देण्यात येणार आहे.

टॅग्स