रेशनची माहिती आता मोबाईल ‘एसएमएस’वर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

पुणे - अन्नधान्य वाहतूक आणि वितरण यंत्रणेची संपूर्ण माहिती आता मोबाईलवर मिळणार आहे. गोदामातून पाठविण्यात आलेले अन्नधान्य, ज्या त्या स्वस्त धान्य वितरण केंद्रांना पुरवठा करणाऱ्या ट्रकचा क्रमांक, धान्यनिहाय वजन, दुकानांचे पत्ते आणि वाहतुकीचा दिवस ही माहिती मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे पाठविण्यात येणार आहे.

धान्य वितरणात पारदर्शकता यावी, या उद्देशाने राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागाने ‘सप्लाय चेन मॅनेजमेंट’ ही संगणकीकृत यंत्रणा विकसित केली आहे. याद्वारे साखर, गहू, तांदूळ आणि केरोसिन आदींच्या साठ्याची संपूर्ण माहिती क्षेत्रनिहाय अन्नधान्य वितरण समिती (रेशनिंग कमिटी) सदस्यांना ‘एसएमएस’द्वारे कळणार आहे. या यंत्रणेची नुकतीच चाचणी घेण्यात आली. ‘एसएमएस गेट वे’मध्ये राज्यातील सर्व अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांसह क्षेत्रनिहाय वितरण समिती सदस्यांचे मोबाईल क्रमांक नोंदविण्यात येणार आहेत. यामुळे रेशनच्या काळ्या बाजाराला आळा बसेल, असे जिल्ह्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी दिलीप भालेदार यांनी सांगितले.

‘ई पॉस’शंभर टक्के कार्यान्वित
जिल्ह्यातील १ हजार ६४० स्वस्त अन्नधान्य वितरण केंद्रांमध्ये ‘इलेक्‍ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल’(ई पॉस) मशिन शंभर टक्के कार्यान्वित झाल्या आहेत. या सर्व केंद्रचालकांना सप्लाय चेन मॅनेजमेंट यंत्रणेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. येत्या दिवाळीपासून शहर आणि जिल्ह्यातील दुकाननिहाय धान्यसाठा, कार्डधारकांच्या संख्येवर निर्धारित केले जाणार आहे. आधार जोडणीमुळे ‘बायोमॅट्रिक थंब इम्प्रेशन’द्वारे धान्य वितरण केले जात असल्याने काळा बाजार, बनावट ग्राहकांवर चाप बसला आहे.

Web Title: pune news mobile SMS ration