‘दोषी एजन्सींवर फौजदारी दाखल करू’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

पुणे - ‘‘वीजमीटरचे रीडिंग घेण्याबरोबरच बिलवाटपासाठी नेमण्यात आलेल्या २९ खासगी एजन्सीज्‌पैकी काहींनी ग्राहकांकडून चुकीची आणि वाढीव बिले आकारल्याचे निदर्शनास येत आहे. अशा एजन्सींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. यासंबंधीच्या सूचना आणि आदेश कार्यकारी आणि अधीक्षक अभियंत्यांना दिले आहेत,’’ अशी माहिती पुणे परिमंडलचे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे यांनी ‘सकाळ’ला दिली.

ते म्हणाले, ‘‘कोथरूड, वारजे परिसरातील ग्राहकांना वेळेत वीजबिले पोचविण्याचे आदेश संबंधित एजन्सीला दिले आहेत. बिल भरणा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांनीही ग्राहकांना चांगली सुविधा द्यावी. नागरिकांच्या तक्रारी वेळेत सोडवाव्यात. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महावितरणतर्फे खासगी एजन्सीच्या पदाधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात येते. ग्राहकांची फसवणूक होऊ नये, त्यांना वाढीव बिले जाऊ नयेत, यासाठी आवश्‍यक ती दक्षता घेण्याचे आदेशही एजन्सीला दिले आहेत.’’

‘‘पुणे शहरात महावितरणचे २७ लाख ग्राहक आहेत. त्यांच्यासाठी ऑनलाइन बिलाची सोय केली आहे, परंतु साधारणतः सात लाख नागरिकच ऑनलाइन बिले भरतात. नागरिकांनी ऑनलाइन सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

‘रीडिंग’ची तपासणी करून घ्या
वीज ग्राहकांच्या मीटरचे हेतुपुरस्सर निष्काळजीपणे रीडिंग घेणाऱ्या एजन्सींविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिले आहेत. एजन्सीने रीडिंग घेतलेल्या दिवशीच महावितरणकडून त्याची तपासणी करून घ्यावी, अशी सूचनाही महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे.

टॅग्स

पुणे

पिंपरी - माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या खुनाची सुपारी घेतलेल्या सराईत गुन्हेगारांना पळवून लावण्यास मदत करणाऱ्या दोन पोलिसांना...

07.21 PM

हडपसर (पुणे): रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील नियोजीत कचरा प्रकीया प्रकल्पाचे काम पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आले. हडपसर प्रभाग...

07.15 PM

तळेगाव स्टेशन : तळेगाव-चाकण रस्त्यावरील ऐश्वर्या हॉटेलमागील गोडाऊन परिसरात सोमवारी (दि. १८) रात्री भक्ष्य खाताना बिबट्या सदृश्य...

05.12 PM