पेट्रोल पंपचालकांचा उद्याचा बंद मागे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

पुणे - पेट्रोलियम कंपन्यांनी विविध मागण्यांवर चर्चा करण्याचे आश्‍वासन दिल्याने पेट्रोल पंपचालकांनी शुक्रवारी (ता. 13) पुकारलेला देशव्यापी बंद मागे घेतला आहे, अशी माहिती पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे (पुणे) अध्यक्ष बाबा धुमाळ व प्रवक्ते अली दारूवाला यांनी कळविली आहे. 

पेट्रोलियम उत्पादने (पेट्रोल व डिझेल) वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) चौकटीत आणावीत. तसेच कमिशन वाढवावे. पंपांवर नागरिकांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे बंधनकारक नसावे. या मागण्यांसाठी पेट्रोल पंपचालकांनी बंद पुकारला होता. मागण्या मान्य झाल्या नाहीतर इंधन खरेदी व विक्री थांबवून 27 ऑक्‍टोबरपासून बेमुदत संपाचा इशाराही पंपचालकांनी दिला होता; परंतु हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल या कंपन्यांकडून पंपचालकांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्याचे पत्र मिळाल्याने बंद मागे घेत असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.

Web Title: pune news Petrol pump owners band