निसर्गप्रेमींनी उधळला वृक्षतोडीचा डाव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

देहूरोड-निगडी रस्ता रुंदीकरण; हरित लवादाकडील प्रकरणात अद्याप निर्णय नाही 
निगडी - देहूरोड-निगडी रस्त्याच्या दुतर्फा असणारे वृक्ष न्यायालयाचा आदेश डावलून तोडण्याचा ठेकेदार कंपनीचा डाव पिंपरी-चिंचवडमधील निसर्गप्रेमींनी मंगळवारी (ता. ३०) उधळून लावला.

देहूरोड-निगडीदरम्यान चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. २६१ वृक्षांची संभाव्य कत्तल या चौपदरीकरणात होणार आहे. मात्र, सावरकर मंडळ व इतर निसर्गप्रेमी स्वयंसेवी संस्था हे वृक्ष वाचविण्यासाठी सरसावले. वृक्ष न तोडण्याविषयीचे आपले म्हणणे हरित लवादापुढे नेले आहे आणि लवादाने या वृक्षांबद्दल अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही.

मात्र, तरीही आज सकाळी रुंदीकरणाचे काम करत असलेल्या ठेकेदार कंपनीने वृक्षांची कत्तल सुरू केली. हे निसर्गप्रेमींना कळताच अनेकजण धावून आले आणि वृक्षांना गराडा घालून ठेकेदार कंपनीला जाब विचारला. वास्तविक ४५ वृक्ष रुंदीकरणात येतात. न्यायालयाच्या आदेशानुसार ती काढा, इतर झाडांना हात लावू नका, नियमानुसार पुनर्रोपण करा, अशी त्यांची मागणी आहे. 

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे धनंजय शेडबाळे म्हणाले की, विकासाला विरोध नाही. जे कडेला आहेत, ते वृक्ष पदपथात घ्या. जे मध्ये येतात ते ४५ वृक्ष काढा व त्यांचे पुनर्रोपण करून नवीन वृक्ष लागवड करावी. पर्यावरणाची हानी होणार असाल तर लोकशाही मार्गाने आंदोलन करू.

कंत्राटदार कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक आर. डी. पाटील व एमएसआरडीसीचे प्रकल्प सल्लागार सागर इंदुरे म्हणाले, ‘‘आम्हाला ९० झाडे तोडण्याची परवानगी मिळाली आहे.’’

गुन्हा दाखल करण्याची मागणी
पिंपरी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील निगडी-देहूरोड रस्ता वृक्षतोड प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आज (ता. ३०) वृक्षतोड केल्याने रस्ते विकास महामंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे ह्यूमन राईटस संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी सांगितले. 
ते म्हणाले, ‘‘वृक्षतोड सुरू असल्याची माहिती मिळताच संस्थेच्या वतीने आम्ही निवासी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांना त्याबाबत माहिती दिली असता रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तथापि, प्रकरण न्यायप्रविष्ट असूनही वृक्षतोड केल्याने महामंडळाच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने द्यावेत, असे मागणीपर निवेदन संस्थेच्या वतीने देण्यात येईल.’’

पुणे

पुणे - सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतील फुलांच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेले हौशी वनस्पती शास्त्रज्ञ श्रीकांत इंगळहळीकर...

01.09 AM

पुणे - मुंबईत सुरू असणाऱ्या संततधार पावसाचा रेल्वे प्रशासनाला पुन्हा एकदा फटका बसला आहे. पावसामुळे बुधवारी मुंबईहून पुण्याला...

01.09 AM

टाकवे बुद्रुक - आंद्रा धरण परिसरात पडलेल्या जोरदार पावसामुळे सांडव्यावरून 516 क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर असाच वाढला...

12.42 AM