गुप्त विठोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

दत्ता म्हसकर
मंगळवार, 4 जुलै 2017

आज (दि.४) सकाळी ईश्वर नकाजी बांगर, दिनेश सखाराम बांगर, सुशील गोविंद बांगर, सागर म्हतु घंगाळे यांच्या हस्ते सपत्नीक (नवदांपत्यांच्या हस्ते) महापूजा करण्यात आली.

जुन्नर - बांगरवाडी (ता. जुन्नर) येथे आज (मंगळवार) आषाढी एकादशीनिमित्त श्री गुप्त विठोबाच्या दर्शनासाठी सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

याठिकाणी आषाढी एकादशीला दिवसभर दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात. श्री गुप्त विठोबा देवस्थान डोंगराच्या कडेला निसर्गाच्या सानिध्यात जमिनीखाली खडकातील भुयारात आहे. याठिकाणी जमिनीवरही ग्रामस्थांच्या वतीने भव्य मंदिर बांधण्यात आलेले आहे. आषाढी एकादशीला याठिकाणी विठ्ठल - रुक्मिणी सेवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

आज (दि.४) सकाळी ईश्वर नकाजी बांगर, दिनेश सखाराम बांगर, सुशील गोविंद बांगर, सागर म्हतु घंगाळे यांच्या हस्ते सपत्नीक (नवदांपत्यांच्या हस्ते) महापूजा करण्यात आली. त्यानंतर दिवसभर सर्व भाविकांसाठी केळी व साबुदाण्याच्या खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. दरम्यान दुपारी पंचक्रोशीतील गावांतून येणाऱ्या भाविकांच्या पायी दिंडी सोहळ्यांचे स्वागत करण्यात येते.

टॅग्स