पुणे: हिंजवडी येथील प्रस्तावित मेट्रो कार डेपोची पाहणी

यशपाल सोनकांबळे
गुरुवार, 11 मे 2017

हिंजवडी येथील राजीव गांधी माहिती व तंत्रज्ञान पार्क फेज 3 येथे कार डेपो प्रस्ताावित आहे. तब्बल 50 एकर जागेची पाहणी करण्यात आली. प्रस्तावित मेट्रो 23.3 कि.मी.चा असून त्या अंतर्गत 23 स्टेशन्स असणार आहेेत.

पुणे - प्रस्तावित शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गातील कार डेपोच्या ५० एकर जागेची पाहणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महामेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.

हिंजवडी येथील राजीव गांधी माहिती व तंत्रज्ञान पार्क फेज 3 येथे कार डेपो प्रस्ताावित आहे. तब्बल 50 एकर जागेची पाहणी करण्यात आली. प्रस्तावित मेट्रो 23.3 कि.मी.चा असून त्या अंतर्गत 23 स्टेशन्स असणार आहेेत. सध्या ग्लोबल टेंडरींगद्वारे निविदा प्रक्रिया सुरू आहे.

यावेळी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते, महामेट्रो रेल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम, पीएमआरडीएचे मुख्य अभियंता सुनिल वांढेकर, कार्यकारी अभियंता सारंगधर देवडे याच्यासमवेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महमंडळाचे (एमआयडीसी) अधिकारी उपस्थित होते.