पिंपरी-चिंचवडमध्ये घ्या हक्काचे घर

Sakal-Vastu
Sakal-Vastu

पिंपरी - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित दोनदिवसीय ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ शनिवारी (ता. २६) व रविवारी (ता. २७) सकाळी ११ ते सायं ८ पर्यंत चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटर येथे होणार आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता होणार आहे. आयटी हब आणि ऑटो हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या या उद्योगनगरीत आपले घर, बंगले, ऑफिस अथवा प्लॉट असावा, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. 

या प्रदर्शनानिमित्त शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी प्रतिक्रिया दिल्या.

चारुदत्त शिंदे, संचालक, कॅसल ड्रीम स्पेसेस - पुणे परिसरातील जेजुरी, भोर आणि सोलापूर येथे प्लॉट घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी प्रशस्त एनए प्लॉट, रेरा रजिस्टर्ड; तसेच बॅंकलोन उपलब्ध असलेले प्लॉट आहेत. भविष्यातील गुंतवणुकीचा उत्तम पर्याय या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. भोर येथे रुपये ९९ प्रतिचौरस फूट या दरात प्लॉट उपलब्ध आहेत.

विशाल ढालवाले, संचालक, आशीर्वाद लॅंडमार्क - आम्ही ग्राहकांना पुणे-मुंबई महामार्गानजीक मावळ परिसरात निसर्गाच्या सान्निध्यात माफक दरात व परवडणारे प्लॉट उपलब्ध करून देत आहोत. प्लॉट व बंगलो व्हिलाज्‌ घेणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे.

राजेश मेहता, संचालक, तनिश असोसिएटस - आमचे चऱ्होली आणि आळंदीत १/२ बीएचके गृहप्रकल्प सुरू आहेत. चऱ्होलीत २ हजार फ्लॅट; तर आळंदीत ५०० फ्लॅट उपलब्ध आहेत. साधारण २० लाख ते ४० लाखांपर्यंत त्यांच्या किमती आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा बॅंकांचे व्याजदर सर्वसाधारण आहेत. ग्राहकांना प्रधानमंत्री आवास योजनेचाही फायदा घेता येऊ शकेल.

बी. व्ही. गायकवाड, संचालक, रोहन कन्स्ट्रक्‍शन - आमचा रावेत येथे २ बीएचकेच्या सुमारे ३४० फ्लॅटच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. तेथील फ्लॅटचे दर साधारणतः ५ हजार १०० रुपये प्रतिचौरस फूट इतके आहेत. सोलर सिस्टिम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, प्लेपार्क यांसारख्या सुविधाही देत आहोत.

अजय विजय, संचालक, स्पर्श रिअल इस्टेट - मोशीत महामार्गालगत आणि  प्राधिकरणापासून हाकेच्या अंतरावर वाजवी दरात आम्ही तयार स्थितीतील १/२/२.५ बीएचके फ्लॅट उपलब्ध करून देत आहोत. सर्व किमतींसह ३० लाख ते ४० लाख रुपयांपर्यंतचे त्याचे दर आहेत. १/२ बीएचकेवर आम्ही १ ते १.५० लाख रुपयांपर्यंतची जादाची सवलत देणार आहोत.

बेंजामिन मॅन्युअल, व्यवस्थापकीय संचालक, युनिक मल्टिकॉन इंडिया प्रा. लि. - बांधकामाच्या दर्जात कोणतीही तडजोड न करता आम्ही १ आणि १.५ बीएचकेचा गृहप्रकल्प साकारत आहोत. सर्व सुख सोयी-सुविधांसमवेत परवडणाऱ्या किमतीत जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत ३ एकरवर हा प्रकल्प आहे. त्यानिमित्त आम्ही नागरिक आणि गुंतवणूकदारांसाठी विविध प्रकारचे प्रस्ताव घेऊन आलो आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com