मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समितीचे वर्षभर वृक्षसंगोपन

navi-sanghavi
navi-sanghavi

नवी सांगवी (पुणे) - पाऊसाळ्याच्या सुरूवातीस मोठ्या थाटामाठात केलेले वृक्षारोपन आणि त्यातून फोटोसेशन करून मिळवलेली प्रसिध्दी; हे सर्व झाल्यानंतर वर्षभर त्या झाडांच्या संगोपनाचे काय? प्रसिध्दीच्या हव्यासापोटी लावलेली झाडे जगतात का? यासारख्या अनेक गोष्टी प्रश्नांच्या स्वरूपातच शिल्लक रहातात. आणि शेवटी या साऱ्यांचा तालमेळ बघितला तर नव्याने लावलेली बहुतांश झाडे ही एक जळून जातात किंवा वेगाच्य वाऱ्याच्या झोतात मोडून पडतात.

पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समितीच्या वतीने पिंपरी-चिंचवडसोबतच मराठवाड्यात अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलेल्या वृक्षांच्या संगोपनाचीही जबाबदारी घेण्यात येत आहे. जेणेकरून लागवड केलेले वृक्ष जगतील अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार यांनी दिली.  

पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या सात वर्षापासून प्रतिवर्षी किमान एक हजार वृक्षांची लागवड केली जाते. एवढेच नाही, तर ही रोपटी जगली पाहिजेत, म्हणून रोपट्याचे वृक्षात रुपांतर होण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात त्यांच्या संगोपनाचीही जबाबदारी ट्रस्टमार्फत घेतली जाते. जास्तीत जास्त वृक्षाची जाळीसह लागवड केली जाते. तसेच वृक्षांना गरजेनुसार टॅकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करण्यात येतो. सन 2012 पासून आठवड्याच्या दर रविवारी वृक्ष संवर्धनासाठी पाणीपुरवठा, स्वच्छता अभियान असे विविध उपक्रम राबिवले जात आहेत. उस्मानाबाद जिल्यातील धारूर, चिंचोली, बिंजनवाडी सोनारी, निजाम जावळा येथे जाळीसह वृक्षलागवड करण्यात आली. तसेच पिंपळे गुरव, मरकळ गाव, भंडारा डोंगर येथेही वृक्षांची लागवड करण्यात आली. श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे मागिल महिण्यात पाचशे रोपांची लागवड करण्यात आली. ही रोपे स्वयंभू होईपर्यंत ट्रस्टमार्फत त्यांची निगा राखण्यात येत आहे. या रोपांना नुकताच बाम्बूच्या काट्यांचा आधार देण्यात आला आहे. जेणेकरून जोरदार वार्‍यामुळे रोपे वाकून त्यांचे नुकसान टळण्यास मदत होईल. यासाठी स्वत: अरूण पवार, भैरुजी मंडले, सूर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे हे वृक्षलागवड केलेल्या ठिकाणी लक्ष देत असतात. 

वृक्षारोपन केलेली रोपे पाण्याअभावी नष्ट होऊ नयेत, यासाठी मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टकडे मागणी केल्यास या रोपांना पिंपरी चिंचवड शहरात कोठेही टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा केला जाईल. वृक्षांचे संगोपन करण्याच्या उद्देशाने मोफत पाणीपुरवठ्यासाठी पिंपळे गुरव येथील ट्रस्टशी संपर्क साधण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com