‘आळंदी-देहू, पंढरपूरसाठी साडेचार हजार कोटी’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

वडगाव मावळ - तीर्थक्षेत्र विकासाचा प्रश्‍न देशाच्या संसदेत प्रथमच मांडला गेला व त्याला प्रतिसाद देऊन केंद्र सरकारने पंढरपूर, देहू व आळंदी या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी साडेचार हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

मावळ तालुका अखिल भारतीय वारकरी मंडळ व येथील श्री पोटोबा देवस्थान संस्थानच्या वतीने विणेकरी, अध्यक्ष व वारकऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी माजी आमदार दिगंबर भेगडे होते. आमदार बाळा भेगडे, गुलाबराव म्हाळसकर, भास्करराव म्हाळसकर, प्रशांत ढोरे, बाळासाहेब ढोरे, नितीन मराठे, सुभाष जाधव, माउली शिंदे, सुखदेव महाराज ठाकर, सोपानराव म्हाळसकर उपस्थित होते. दत्तोबा महाराज बालगुडे यांना निष्ठावंत वारकरी पुरस्कार; तर पोटोबा देवस्थानच्या वतीने किसनराव खानेकर यांना कर्तव्यदक्ष सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. डॉ. विकेश मुथा यांची निवड झाल्याबद्दल; तसेच पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत स्ट्राँगमॅन किताब पटकाविल्याबद्दल मनोज म्हाळसकर या खेळाडूचा सत्कार करण्यात आला.  

बारणे म्हणाले, ‘‘केंद्राने देहू, आळंदी व पंढरपूरच्या विकासासाठी साडेचार हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या तीर्थक्षेत्रांचा कायापालट होणार आहे.’’ भेगडे म्हणाले ‘‘मावळचे नेतृत्व वारकरी संप्रदायाने केले आहे. त्यांचा आदर्श घेऊनच पुढील वाटचाल सुरू आहे.’’ अनंता कुडे यांनी प्रास्ताविक केले. गणेश महाराज जांभळे यांनी सूत्रसंचालन केले. गोपीचंद महाराज कचरे यांनी आभार मानले.