पवना धरणातील गाळ काढण्याच्या कामास सुरवात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

यासाठी बारणे यांनी त्यांच्या खासदार निधीतील दहा लाख रुपये खर्च केले. या वर्षीही पवना धरणातील गाळकाढण्यासाठी खासदार निधीचा वापर करणार असून प्रत्यक्षात गाळ काढण्याच्या कामाची आज सुरवात केली आहे.

पिंपरी : पवना धरण पाण्यातील साठलेला गाळ काढण्याच्या कामाला सोमवारपासून सुरुवात झाली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, पाटबंधारे खात्याचे उपअभियंता नानासाहेब मटकरी, शाखा अभियंता मनोहर खाडे, आदी उपस्थित होते. 

पवना धरणात साठलेला गाळ काढण्याचा उपक्रम गेल्यावर्षीपासून सुरू करण्यात आला आहे. गेल्या वर्षी 37 हजार क्‍युबिक मीटर गाळ काढून धरण पात्रामध्ये पाण्याचा मोठा साठा वाढवण्याचे काम केले.

यासाठी बारणे यांनी त्यांच्या खासदार निधीतील दहा लाख रुपये खर्च केले. या वर्षीही पवना धरणातील गाळकाढण्यासाठी खासदार निधीचा वापर करणार असून प्रत्यक्षात गाळ काढण्याच्या कामाची आज सुरवात केली आहे.

पाऊस चालू होईपर्यंत पवना धरणातील जास्तीत जास्त गाळ काढण्यात येईल असे खासदार बारणे यांनी सांगितले.