जगभरातील माध्यमं तिहेरी तलाकबद्दल काय म्हणताहेत?

टीम ई सकाळ
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

संपूर्ण जगभरात इस्लाममध्ये अनेक पंथ, सांप्रदाय, गट-तट आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या धारणा, प्रथा, रुढी, पंरपरा आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील दुसऱ्या क्रमांकाचा धर्म असणाऱ्या इस्लाममधील या पूर्वापार चालत आलेली प्रथा स्त्रियांवर अन्यायकारक ठरत असल्याचा मतप्रवाह आहे.

तोंडी तलाक हा भारतीय मुस्लिम समाजात गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय बनला आहे. तोंडी तलाकला सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरविले आहे. पाचपैकी तीन न्यायाधीशांनी तोंडी तलाख बेकायदा ठरविला. उर्वरीत दोन न्यायाधीशांनी सरकारने कायदा बनवावा असे मत व्यक्त केले आहे. 

यावर प्रतिबंध घालण्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे भारतासह जगभरात या निकालाची चर्चा सुरू झाली. बहुतांश विदेशी माध्यमांनी तोंडी तलाकचा उल्लेख 'इंस्टंट डिव्होर्स' असा सुबोध भाषेत केला आहे. याबद्दल जगभरातील प्रमुख वृत्तपत्रांनी दिलेल्या बातम्यांचा थोडक्यात गोषवारा...

न्यूयॉर्क टाईम्स
ज्या तरतुदीच्या आधारे मुस्लिम पुरुष त्यांच्या पत्नीला ताबडतोब घटस्फोट देऊ शकत होते, ती तरतुद भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली आहे. मुस्लिम जगतात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर नाकारल्या जात असलेल्या या प्रथेविरोधात ही न्यायालयाने ही भूमिका घेतली आहे. सविस्तर वृत्त :

वॉशिंग्टन पोस्ट
शेकडो वर्षांपासून भारतातील मुस्लिम तीनवेळा 'तलाक' हा शब्द उच्चारून त्यांच्या बायकांना घटस्फोट देऊ शकत होते. मंगळवारी येथील सर्वोच्च न्यायालयाने ही प्रथा घटनाबाह्य असल्याचे जाहीर केले. सविस्तर वृत्त :

वॉशिंग्टन पोस्टने याबाबत एक विश्लेषणही प्रसिद्ध केले आहे. 
'महिलांविरोधातील तडकाफडकी घटस्फोट बेकायदा ठरविण्यास भारताला इतकी वर्षे का लागली?' अशा प्रश्नात्मक मथळ्याखाली मिली मित्रा यांनी हे विश्लेषण केले आहे. यामध्ये शाह बानो खटल्यावेळी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी मुस्लिम मतदारांना थोपविण्यासाठी कसा निर्णय बदलला... आणि आताही नरेंद्र मोदी यांचा पक्ष मुस्लिमासांठी घोषणांशिवाय विशेष काही करू शकलेला नाही याकडे या लेखात लक्ष वेधले आहे. सविस्तर वृत्त :

सिडनी मॉर्निंग हेराल्ड
मुस्लिमांसाठीचा ताबडतोब घटस्फोट देण्याबाबतचा एक कायदा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने असंवैधानिक ठरवला आहे. अनेक दशकांपासून याविरोधात आवाज उठविणाऱ्या मुस्लिम महिलांचा हा विजय आहे, असे या ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने म्हटले आहे. सविस्तर वृत्त :

स्ट्रेट टाईम्स सिंगापूर
भारतात इस्लामिक ताबडतोब घटस्फोटावर बंदी अशा शीर्षकाखाली सिंगापूरच्या या वृत्तामध्ये मुस्लिम महिलांचा या जुन्या परंपरेला कडवा विरोध होता असे म्हटले आहे. सविस्तर वृत्त :

द डॉन (पाकिस्तान)
भारतातील सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तिहेरी तलाकची वादग्रस्त इस्लामिक प्रथा 3-2 अशा बहुमताने असंवैधानिक असल्याचा निर्णय दिला. या वृत्तात शायरा बानो यांच्या खटल्याचीही थोडक्यात माहिती दिली आहे. सविस्तर वृत्त :

सातत्याने भारत-चीनमधील तणावपूर्ण संबंधांवरच उलटसुलट भाष्य करणाऱ्या चिनी सरकारी माध्यमांनीही या निर्णयाची दखल घेतली आहे. 
चायना डेली
मुस्लिम महिलांना देण्यात येणारे ताबडतोब घटस्फोट बेकायदा असल्याचा निकाल भारतीय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सविस्तर वृत्त :

ग्लोबल टाईम्स (चीन) 
भारताने इस्लामिक ताबडतोब घटस्फोटावर घातली बंदी... सविस्तर वृत्त :

द गार्डियन (इंग्लंड) 
तिहेरी तलाकची वादग्रस्त प्रथा घटनाबाह्य असल्याचे भारतात घोषित करण्यात आले आहे. महिलांच्या हक्कांसाठी हा मोठा विजय असल्याचेही द गार्डियनने म्हटले आहे. सविस्तर वृत्त :

अल् जझिरा
तिहेरी तलाकवर भारतीय सोशल मीडियात उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटल्याचे या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. सविस्तर वृत्त :

टेलिग्राफ (इंग्लंड)
महिलांसाठी मोठे पाऊल उचलत भारताने तिहेरी तलाकवर बंदी घातल्याचे 'टेलिग्राफ'ने म्हटले आहे. सविस्तर वृत्त :

बीबीसी लंडन
'भारतीय न्यायालयाची इस्लामिक तडकाफडकी घटस्फोटावर बंदी' अशी बातमी बीबीसीने दिली आहे. सविस्तर वृत्त :

तसेच, 'तिहेरी तलाकविरोधातील लढाई मुस्लिम महिला कशा जिंकल्या' असे विश्लेषणही प्रसिद्ध केले आहे. सविस्तर वृत्त :

तिहेरी तलाकवरील या बंदीबाबत काय प्रतिक्रिया आहे हे बीबीसी वृत्तवाहिनीने दाखवले. 

सीएनएन
भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल असे वर्णन 'सीएनएन'ने केले आहे. सविस्तर वृत्त :

फॉक्स न्यूज
तिहेरी तलाक असंवैधानिक ठरवत याबाबत कायदा बनविण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले.  सविस्तर वृत्त :

खलिज टाईम्स 
तिहेरी तलाकची प्रथा ठरवली रद्दबातल... भारतातील या प्रथेनुसार पाकिस्तान आणि बांगलादेशातही असा घटस्फोट कायद्याने वैध मानला जात नाही असे खलिज टाईम्सने म्हटले आहे. सविस्तर वृत्त :

UAE, पाकिस्तानसह 19 देशांनी तिहेरी तलाक यापूर्वीच बंद केला असल्याचे वृत्तही खलिज टाईम्सने दिले आहे. सविस्तर वृत्त :

गल्फ न्यूज
या वृत्तपत्राने या निर्णयाचे सविस्तर वार्तांकन केले आहे. 
वादग्रस्त मुस्लिम घटस्फोटाच्या प्रथेला स्थगिती सविस्तर वृत्त 

मुस्लिम लॉ बोर्डाकडून निर्णयाचे स्वागत  सविस्तर वृत्त 

तिहेरी तलाकविरोधात लढणाऱ्या पाच प्रमुख महिलांबद्दल माहिती देणारा लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे.  सविस्तर वृत्त