धुळे: टँकरद्वारे पिकांना पाणी; पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल

तुषार देवरे
रविवार, 9 जुलै 2017

नेर (ता.धुळे) येथील शेतकरी शंकर कोळी यांनी पाण्याचे टँकर भरून थेट नळीद्वारे प्रत्येक झाडाला पाणी देण्याचे सुरू केले आहे. शेतकरी कोळी यांनी पाच बिघे कोरडवाहू कपाशी लागवड केली आहे. कपाशी पीक कोमजू लागले आहे.

धुळे : पाऊस नसल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. तालुक्यात बहुतांश ठिकाणी पेरण्याच झालेल्या नाहीत. तर ज्या भागात वरूणराजाने हजेरी लावली ;त्या परिसरात शेतकऱ्यांनी पेरण्या व कोरडवाहू कपाशी लागवड केली आहे. ते पीके आज सध्या परिस्थितीत जगविणे आव्हान ठरले आहे. तर दुसरीकडे पावसाअभावी दुबार पेरणीचे संकंट ओढवले आहे. त्याच बरोबर शेतकर्यांना कपाशी वाचविण्याची धडपड करावी लागत आहे.

नेर (ता.धुळे) येथील शेतकरी शंकर कोळी यांनी पाण्याचे टँकर भरून थेट नळीद्वारे प्रत्येक झाडाला पाणी देण्याचे सुरू केले आहे. शेतकरी कोळी यांनी पाच बिघे कोरडवाहू कपाशी लागवड केली आहे. कपाशी पीक कोमजू लागले आहे. लागवड केलेल्या कपाशी पीक झालेला खर्च व वाया जाऊ नये, म्हणून पाण्याचे टँकर भरून टँकरला नळी जोडून कपाशी झाडाच्या मुळाशी टाकत आहे.

कपाशी जगवण्याची धडपड कोळी कुटुंबाची सुरू आहे. काल पासून त्यांनी पाण्याचे टँकर सुरू केले आहे. आज, उद्या पाऊस येईल अशी अपेक्षा त्यांना आहे. ऊन सावल्यांचा खेळ दररोज सुरू आहे. वरूणराजा बरसत नाही. मात्र पावसाची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याला पर्याय उरलेला नाही.