नाशिकमधील दारणा नदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

नाशिकमधील दारणा नदीपात्रात पोहण्याच्या निमित्ताने गेलेल्या आणि बेपत्ता झालेल्या चार किशोरवयीन मुलांपैकी दोघांचा मृतदेह सापडला असून अन्य दोन जण बेपत्ता आहेत.

नाशिक : नाशिकमधील दारणा नदीपात्रात पोहण्याच्या निमित्ताने गेलेल्या आणि बेपत्ता झालेल्या चार किशोरवयीन मुलांपैकी दोघांचा मृतदेह सापडला असून अन्य दोन जण बेपत्ता आहेत.

गुरुवारी संध्याकाळी नाशिक शहरानजीकच्या पळसे गावातील सुमित राजेंद्र भालेराव (वय 15), कल्पेश शरद माळी (वय 13), गणेश रमेश डहाळे (वय 17) आणि रोहित आधार निकम (वय 13) हे चार जण दारणा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाही. त्यामुळे शोध घेतल्यानंतर आज (शनिवार) सकाळी या चौघांपैकी कल्पेश आणि सुमित यांचे मृतदेह सापडले असून गणेश आणि रोहित अद्यापही बेपत्ता आहेत. त्या दोघांचाही शोध घेण्यात येत आहे. दोन्ही मुलांचे मृतदेह नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असून तेथे त्यांच्या शोकाकुल नातेवाईकांनी गर्दी केली आहे.

टॅग्स