नाशिकमधील सोनसाळखीची चोरी सीसीटीव्हीत कैद (Video)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

मुंबई नाका पोलिस स्थानकाशेजारी बुधवारी रात्री एका महिलेच्या गळ्यातील 70 हजार रुपयांची सोनसाखळी एका व्यक्तीने हिसकावून नेली. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला असून या प्रकारणाचा तपास सुरू आहे.

नाशिक : मुंबई नाका पोलिस स्थानकाशेजारी बुधवारी रात्री एका महिलेच्या गळ्यातील 70 हजार रुपयांची सोनसाखळी एका व्यक्तीने हिसकावून नेली. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला असून या प्रकारणाचा तपास सुरू आहे.

नाशिकमधील मुंबई नाका पोलिस स्थानकाशेजारी असलेल्या साहेब हॉटेलच्या दारात बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. नाजिया फैय्याज सैय्यद नावाच्या महिलेच्या गळ्यात 70 हजार रुपये किंमतीची सोनसाखळी होती. त्यावेळी एकाने जोराने झटका देऊन महिलेची सोनसाखळी हिसकावून धूम ठोकली. पोलिस स्थानकाशेजारीच घडलेल्या या प्रकारातून आणखी विशेष बाब म्हणजे नाजिया एका पोलिस कर्मचाऱ्याचीच सून आहे. या प्रकाराचा पोलिस तपास करत असून संबंधित साखळीचोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.