नाशिकमध्ये व्हॉटसऍपचे हॅकिंग; दक्षतेचे आवाहन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 जून 2017

शहरात अज्ञात व्यक्तीद्वारे व्हॉटसऍप हॅकिंगचे प्रकार करत असल्याचे समोर आले असून याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नाशिक : शहरात अज्ञात व्यक्तीद्वारे व्हॉटसऍप हॅकिंगचे प्रकार करत असल्याचे समोर आले असून याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मागील दोन दिवसांपासून शहरातील वेगवेगळ्या व्हॉटसऍप ग्रुपमधील सदस्यांचे व्हॉटसऍप हॅक होण्याचे प्रकार घडत आहेत. विशेषत: मॉडेलिंग, सायकलिस्ट आणि डॉक्‍टरांच्या व्हॉटसऍप ग्रुपमधील सदस्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. हॅकिंग करणारी व्यक्ती अकाऊंट हॅक केल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या अकाऊंटमधील इतर ओळखीच्या व्यक्तीस व्हॉटसऍप करून ओटीपी (वन टाईम पासवर्ड) तयार करून ओटीपीची मागणी करतो. सदर ओटीपी प्राप्त होताच संबंधित व्यक्तीचे अकाऊंटही हॅक होऊ शकते, अशी माहिती नाशिक पोलिस आयुक्तालयाने प्रसिद्ध केली आहे.

अशा प्रकारांबाबत डॉ. गौरी पिंप्रोळकर व निलेश दाते यांनी तक्रार केली आहे. त्यांच्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नाशिक पोलिसांनी असे प्रकार टाळण्यासाठी नागरिकांना दक्षता घेण्याची आणि कोणालाही ओटीपी न देण्याची तसेच व्हॉटसऍपचे Two Step Verification करण्याचे आवाहन केले आहे.

उत्तर महाराष्ट्र

वणी (नाशिक): सप्तश्रृंगी गडावर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेस आदिमायेचे दर्शनासाठी येणाऱ्या केळी रुम्हणवाडी (ता. अकोले) येथील...

08.00 PM

वणी (नाशिक) :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत सप्तशृंग मातेच्या नवरात्रोत्सवास उद्या (गुरुवार) पासून उत्साहात सुरुवात होत असून,...

07.15 PM

नाशिक : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले व उचच न्यायालयाने जामीन...

02.18 PM