मास्क न वापरता हिरोगिरी करणाऱ्यांना महापालिकेने कसा दिला धक्का ? वाचा सविस्तर

How did the Municipal Corporation give a shock to those who do heroism without wearing a mask?
How did the Municipal Corporation give a shock to those who do heroism without wearing a mask?
Updated on

नागपूर : शासन, महापालिकेचे स्पष्ट निर्देश असतानाही मास्क न वापरता हिरोगिरी करणाऱ्यांना आज महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने दणका दिला. कोरोनाच्या संसर्गाकडे दुर्लक्ष करून इतरांसाठी धोका ठरत असलेल्या २२६ बेजबाबदारांवर महापालिकेने दंड ठोठावत त्यांचे खिशे हलके केले. महापालिकेने आता मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली. 

शहरात दररोज दीड हजारांवर कोरोनाबाधित वाढत असून चाळीसवर नागरिकांचा बळी जात आहे. गंभीर स्थिती असतानाही अनेकजण हिरोगिरी करीत आहे. कोरोनाचे संक्रमण होणारच नाही, अशा थाटात मास्कशिवाय अनेकजण फिरत आहे. दररोज वाढत्या संख्येमुळे महापौर संदीप जोशी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या सूचनेनुसार उपद्रव शोध पथकाने कारवाईला गती दिली आहे.

त्याचेच परिणाम आज शुक्रवारी (ता.४) मास्क न लावणाऱ्या तब्बल २२६ बेजबाबदारांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात पथकाने दहाही झोनमध्ये कारवाई करीत ४५ हजार २०० रुपये दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने सतरंजीपूरा झोनमध्ये सर्वाधिक ४८ जणांवर कारवाई करीत ९ हजार ६०० रुपये दंड वसूल केला. धरमपेठ झोनमधील ४१ जणांवर ८२०० रुपये दंड ठोठावण्यात आला.

आशीनगर झोन पथकाने ३५ जणांकडून ७००० रुपये, धंतोली झोनमधील २३ जणांकडून ४६०० रुपये, गांधीबाग व लकडगंज झोनमधील प्रत्येकी २० जणांवर कारवाई करीत ४००० रुपये, लक्ष्मीनगर झोनमधील १७ जणांकडून ३४०० रुपये, हनुमाननगर झोनच्या १२ जणांकडून २४०० रुपये, नेहरूनगर झोनमधील ५ जणांवर कारवाई करीत १००० रुपये आणि मंगळवारी झोन पथकाने तिघांवर कारवाई करीत ६०० रुपये दंड वसूल केले. याशिवाय मनपा मुख्यालयात सुद्धा दोघांवर कारवाई करून ४०० रुपये दंड वसूल करण्यात आले.

प्रत्येकी दोनशे रुपयांचा भुर्दंड
प्रत्येक नागपूरकराला कोरोना संसर्ग होण्याचा धोका आहे. अशा स्थितीतही बेजबाबदार वागणुकीमुळे स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात टाकणाऱ्यांना शिस्त लावणे, त्यांना नियमांचे पालन करण्यास बाध्य करण्याच्या हेतूने महापालिकेने प्रत्येकावर दोनशे रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांवर दंड ठोठावण्याचा उद्देश नाही. त्यांना मास्कची सवय लावण्याच्या हेतूने कारवाई केली जात असल्याचे उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांनी सांगितले.

कठोर कारवाईचे महापौरांचे संकेत
गंभीर स्थितीतही अनेकजण सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत नसल्याची खंत महापौर जोशी यांनी व्यक्त केली. अनेकजण अजूनही कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत. दिशानिर्देशाचे पालन करीत नाही. त्यामुळे आता अत्यंत कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीही ही कारवाई सुरू होती, परंतु आता कठोर व्हावे लागणार आहे. मास्क न लावणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश उपद्रव शोध पथकाला देण्यात आल्याचे महापौर संदीप जोशी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com