नामनिर्देशित सदस्य ठरताहेत भारी...वाचा सविस्तर

Nominated members are huge ... read more
Nominated members are huge ... read more

नागपूर ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध अभ्यास मंडळांवर निवडून गेलेल्या सदस्यांना कोणत्याही निर्णयात सहभागी करून घेण्यात येत नसल्याने त्यांच्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. दुसरीकडे नामनिर्देशित सदस्य वरचढ ठरत असल्याचे काही सदस्यांनी कुलगुरूकडे राजीनामा दिला आहे.  

अडीच वर्षांपूर्वी अभ्यास मंडळांच्या निवडणुकांमध्ये प्रत्येकी तीन सदस्य निवडून आले. नव्या कायद्यानुसार अभ्यासमंडळात तीन सदस्य निवडणून आलेले तर इतर सदस्य नामनिर्देशित, तसेच त्या त्या विषयातील विविध तज्ज्ञ अशी रचना करण्यात आली. या निवडणुकांमध्ये शिक्षण मंचाचा पराभव झाला होता. मात्र, सरकार आणि राज्यपाल भाजपचे असल्याने नामनिर्देशित सदस्यांमध्ये शिक्षक मंचाने बाजी मारली. त्यामुळे बहुतांश अभ्यास मंडळांवर शिक्षक मंचाचे वर्चस्व दिसून येते. याशिवाय अध्यक्षपदावरही शिक्षण मंचाने वर्चस्व सिद्ध केले.

आता मंडळांवर निवडून आलेल्या सदस्यांचे अभ्यासक्रमातील बदलांवर म्हणणे ऐकून घेतले जात नाही. या सदस्यांकडून आलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जाते. याबाबत काही सदस्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी यास दुजोरा देत निवडून आलेले सदस्यांना कुठलीच किंमत नसल्याचे मत व्यक्त केले. शिवाय सूचना स्वीकारण्यात येत नसल्याचेही सांगितले. या प्रकाराने सदस्यांमध्ये खदखद आहे.

मंडळाच्या सदस्याचा राजीनामा
अभियांत्रिकी अभ्यासक्रमावरून मंडळाच्या सदस्यांनी कुलगुरुंना अनेक निवेदने दिली. मात्र, यावर कुठलीच कारवाई न झाल्याने यातील काही सदस्याने राजीनामा दिला. इतर मंडळातील सदस्य राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com