ऑनलाइन शिक्षणला स्वाध्याय पुस्तिका ठरू शकते पर्याय

An swadhyay book can be an option to Online learning
An swadhyay book can be an option to Online learning

नागपूर  : कोरोनाच्या प्रकोपामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक होता कामा नये म्हणून ‘ऑनलाइन शिक्षण’ सुरू करण्यात आले. दीक्षा अ‍ॅपच्या माध्यमातून ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ असून विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचा दावा करण्यात येते. परंतु वास्तविकता वेगळीच आहे. आजही ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा पोहोचली नसून निम्म्यावर पालकांकडे ॲँड्राइड मोबाईल नसल्याने ऑनलाईन शिक्षण केवळ कागदोपत्रीच आहे.

तर सह्यांद्री वाहिनीवरीलही ‘टिलीमिली’ हा उपक्रम प्रभावी ठरत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्वाध्याय हा चांगला पर्याय ठरू शकणार असल्याचे सांगण्यात येते.शहरी भागात ‘ऑनलाइन शिक्षण’ शाळांना फी हवी असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी सुरू आहे. मात्र, ग्रामीण भागातील निम्म्याहूनही कमी पालकांकडे अ‍ँड्राइड मोबाईल आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शंभर टक्के विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत आहेत का? हाच खरा प्रश्न आहे.

जिथे पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न आहे, तिथे ‘अ‍ँड्राइड’ मोबाईल विकत घेऊन इंटरनेट रिचार्ज करू शकेल का? दोन-तीन पाल्य असणारा पालक काय करणार, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. गावातील काही मोठ्या विद्यार्थ्यांची शिक्षक मित्र म्हणून निवड करून त्यांच्या माध्यमातून स्वाध्याय पुस्तिका सोडविणे शक्य आहे. जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण सभेत वर्ग मित्रावर चर्चाही झाली होती.

१२१ शाळांमधील शिक्षणांनी सुरू केला उपक्रम
शिक्षकांनी आठवड्यातून काही दिवस विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन स्वाध्याय पुस्तिका तपासली व शंकेचे निराकरण केले तर उत्तम शिक्षण सुरू राहील. नागपूर जिल्ह्यात काटोल, नरखेड, पारशिवनी,रामटेक व हिंगणा तालुक्यातील जवळपास १२१ जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांनी स्वत:च्या खर्चाने विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका तयार करून दिल्यात.

मात्र १०० टक्के विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रवाह अबाधित ठेवण्याकरिता शासनाने किंवा जिल्हा परिषदेने सेस फंडातून तरतूद करावी,अशी जिल्ह्यातील शिक्षकांची मागणी आहे. यामुळे शाळा बंद असल्यातरी ऑफलाईन पद्धतीने शंभर टक्के विद्यार्थांचे शिक्षण सुरू राहील, असा विश्वास शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com