दारू व्यावसायिकाकडून लाच घेताना पाेलिसाला अटक

प्रवीण खेते
शुक्रवार, 23 जून 2017

दारूचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी मागितली तीन हजारांची लाच
 

अकाेला : खदान पाेलिस ठाण्यातील स्थानिक गुन्हे शाखेचा पाेलिस कर्मचारी प्रदीप पवार याला तीन हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहाथ अटक केली.

खदान पाेलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या परिसरात युवराज राठाेड नामक व्यक्तीचा दारूचा व्यवसाय आहे. त्याचा दारूचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचा पाेलिस कर्मचारी प्रदीप पवार याने तीन हजार रुपयांची लाच मागीतली हाेती.

या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी खदान पाेलिस ठाण्यात सापळा रचला. रात्री ९ वाजताच्या सुमारास युवराज राठाेड नामक व्यक्तीने खदान पाेलिस स्टेशनमध्ये येऊन पाेलिस कर्मचारी प्रदीप पवार याला तीन हजार रुपये दिले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रदीप पवार याला रंगेहाथ अटक केली. वृत्त लिहिस्ताेवर या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे पुढील कारवाई सुरू हाेती.