प्लांट टिशू कल्चर लॅब’ सुरू होण्यापूर्वीच रद्द

अनुप ताले
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

खासगी कंपन्यांचाच दबदबा 
प्लांट टिशू कल्चर करून मुल्यवान रोपे विक्री करण्यासाठी विदर्भात नागपूर व यवतमाळ येथील खासगी व्यावसायीकांकडेच दोन लॅबची उपलब्धता आहे. त्यामुळे त्यांनी ठरविलेल्या दरातच शेतकऱ्यांना रोपे खरेदी करावी लागत आहेत. मात्र, शासकीय यंत्रणेमध्ये, विदर्भात ही पहिलीच टिशू कल्चर लॅब तयार होत असल्याने, त्यातून ना नफा ना तोटा तत्वावर शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व शाश्वत उत्त्पन्न देणारी रोपे मिळणार होती. परंतु, हा उपक्रम रद्द झाल्याने, मुल्यवान रोपे निर्मिती व विक्रीसाठी खासगी व्यावसायीकांचाच दबदबा राहणार आहे.

अकोला : गतवर्षी सामाजिक वनिकरण विभाग अकोल्याला विदर्भातील ‘पहिली’ ‘प्लांट टिशू कल्चर लॅब’ मंजूर झाली होती. त्यामुळे जिल्ह्यात तसेच विदर्भातील शेतकऱ्यांना चंदन, मोह इत्यादी मुल्यवान तसेच एकाच मातृत्वाची गुवत्तापूर्ण लाखो रोपे अल्प कालावधीत मिळणार होती. मात्र, सामाजिक वनिकरण विभागाच्या मुख्यालयानेच ही मंजूरी रद्द करून अकोला सामाजिक वनविभागाला घरचा अाहेर दिला आहे. उपक्रमांतर्गत अकोला विभागाने कल्चर मीडिया तयार करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केल्याने, मोठा फटका बसला आहे. 

गुणवत्तापूर्ण तसेच खात्रीशिर उत्पन्न देणारे मुल्यवान वृक्ष लावडीतून शेतकऱ्यांना अधिकाधीक व शाश्वत उत्पन्न मिळावे म्हणून, विदर्भात पहिल्यांदाच अकोला सामजिक वनिकरण विभागाला शासनाने टिशूकल्चर लॅब मंजूर केली होती. याकरिता जवळपास १५ लाख रुपये निधीसुद्धा प्राप्त झाला होता. या निधीतून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून मोह, चंदन या रोपांसाठी कल्चर मीडिया तयार केले जाणार असून, लोखो रुपये अग्रीमसुद्धा देण्यात आला होता. त्यानुसार एकाच मातृत्वाचे चंदन, मोहाची हजारो रोपे जुलै २०१७ मध्ये अकोलेकरांना उपलब्ध होणार असल्याचा विश्वास अकोला सामाजिक वनिकरणचे उपसंचालक विजय माने यांनी व्यक्त करून पूर्व नोंदणीसाठी शेतकऱ्यांना आवाहनसुद्धा केले होते. परंतु, हा उपक्रम राबविण्याकरिता अकोला सामाजिक वनिकरण विभागाकडे पर्याप्त मनुष्यबळ व सक्षम यंत्रणा नसल्याचा निवाडा केल्याने, सुरू होण्यापूर्वीच हा उपक्रम रद्द झाला आहे. 

खासगी कंपन्यांचाच दबदबा 
प्लांट टिशू कल्चर करून मुल्यवान रोपे विक्री करण्यासाठी विदर्भात नागपूर व यवतमाळ येथील खासगी व्यावसायीकांकडेच दोन लॅबची उपलब्धता आहे. त्यामुळे त्यांनी ठरविलेल्या दरातच शेतकऱ्यांना रोपे खरेदी करावी लागत आहेत. मात्र, शासकीय यंत्रणेमध्ये, विदर्भात ही पहिलीच टिशू कल्चर लॅब तयार होत असल्याने, त्यातून ना नफा ना तोटा तत्वावर शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व शाश्वत उत्त्पन्न देणारी रोपे मिळणार होती. परंतु, हा उपक्रम रद्द झाल्याने, मुल्यवान रोपे निर्मिती व विक्रीसाठी खासगी व्यावसायीकांचाच दबदबा राहणार आहे. 

सामाजित वनिकरण विभाग समाजपयोगी कामाकरिताच असल्याने, या उपक्रमातून निश्चितच शेतकऱ्यांना मोठा लाभ झाला असता. त्यामुळे ही टिशुकल्चर लॅब व्हावी याकरिता आम्ही तसेच अमरावीत विभागाने बरेच प्रयत्न केले. त्याकरिता टेंडरसुद्धा मंजूर झाले होते. त्यानुसार डॉ.पंदेकृवि यांचेकडे मोह, जांबुळ, बांबु, चंदन/साग यांचे कल्चर मीडिया निर्मितीचे काम सोपविले होते. परंतु, काही कारणाने, हा उपक्रम रद्द झाला आहे. लवकरच या विषयांतर्गत मिटींग होणार असून, पुन्हा त्याकरिता प्रयत्न करू. 
- विजय माने, उपसंचालक, सामाजिक वनिकरण, अकोला