बॉटल नेकच्या रुंदीकरणासाठी मजुरांची जीवघेणी कसरत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

कामगार कल्याण मंडळाचे कार्यालय याच रस्त्यावर असून, मनपाचे अधिकारी मोठ्या प्रमाणात याच भागात राहतात. तरीही कुणाचे या मजुरांवर लक्ष नाही. दुसऱ्या, तिसऱ्या माळ्यावर काम करतांना मजुरांचा प्राण जाण्याची जास्त शक्यता असते. मजुरांना सुरक्षित साधने पूर्वीविण्याची जबाबदारी असतांनाही पार पडली नाही.

अकोला ; गौरक्षण रोड बॉटल नेक रुंदीकरणासाठी तातडीने अतिक्रमण हटविण्यात येत आहे. मनपाच्या गजराज मुळे पूर्ण इमारत शिकस्त होत आहे. दोन ते तीन मजली इमारत तोडताना मजुरांना संरक्षक साहित्य पुरविले जाते नाही. सध्या शहरात मजुरांना काम उपलब्ध नसल्याने या रोडवर मजूर जीवाची पर्वा न करता काम करीत आहे. मात्र मनपाने किंवा कामगार कल्याण आयुक्त यांनी मजुरांना साहित्य पुरविण्याची जबाबदारी असतांना जबाबदारी पार पडली जात नाही.

कामगार कल्याण मंडळाचे कार्यालय याच रस्त्यावर असून, मनपाचे अधिकारी मोठ्या प्रमाणात याच भागात राहतात. तरीही कुणाचे या मजुरांवर लक्ष नाही. दुसऱ्या, तिसऱ्या माळ्यावर काम करतांना मजुरांचा प्राण जाण्याची जास्त शक्यता असते. मजुरांना सुरक्षित साधने पूर्वीविण्याची जबाबदारी असतांनाही पार पडली नाही. याबाबत अकोला बिल्डिंग, पेंटर्स, बांधकाम मजूर असो. चे नेते शैलेश सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनमध्ये अनेकदा मोर्चे, आंदोलन, व निवेदन दिले आहेत. तरीही अधिकारी, कंत्राटदार, यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे भविष्यात दुर्दैवाने एखाद्या घटनेत मजुरांचा बळी गेल्यास हे अधिकारी व कंत्राटदार जबाबदार असणार आहेत, असा इशारा अकोला बिल्डिंग, पेंटर्स, बांधकाम मजूर असोसिएशनने पुन्हां एकदा लेखी निवेदनद्वारे दिला आहे.

यावेळी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, अब्दुल बशीर, प्रशांत मेश्राम, आत्माराम साठे,ययुवराज खडसे, मदन भगत, बाबूलाल डोंगरे, अब्दुल जमीर, गणेश नृपणारायन, गणेश सावळे, शेख लाल, सत्यशील बवनगडे, प्रवीण खंडारे, सतिष वाघ, अनिल वाघमारे, सुनील तायडे, सुरेश कारंडे, पंचशील गज घाटे , भास्कर सोनोने, मनोज बावीस कर, मदन वासनिक, किशोर सोनोने, संजय हिवराळे, सह अनेकांची उपस्थिती होती.